आजकाल ट्रेनचा प्रवास हा अनेकांना आयुष्याचा एक भाग बनला आहे. ट्रेनने प्रवास करणाऱ्या लोकांना प्रवास करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, पहिली समस्या म्हणजे तिकीट कन्फर्मेशन आणि दुसरी म्हणजे, तिकीट रद्द करणे. अनेकदा तिकीट बुक केल्यानंतर लोक ते कन्फर्म होण्याची वाट पाहतात, पण तिकीट कन्फर्म होणार नाही, असे दिसताच ते तिकीट रद्द करून दुसऱ्या ट्रेनचे तिकीट बुक करतात.
मात्र तिकीट रद्द केल्यावर, नेहमी आपल्याला एक चिंता लागून राहते की, रिफंड केव्हा येईल. कदाचित तुमचीही अशीच परिस्थिती असेल. आम्ही तुम्हाला सांगतो, तिकीट रद्द केल्यानंतर, दोन ते चार दिवसांत पैसे तुमच्या खात्यात जमा होतील असा संदेश येतो. पण अनेक वेळा असे होत नाही. तुमच्यावरही अशी परिस्थिती कधी ना कधी ओढवली असेलच. मात्र आता चिंता करू नका कारण आज आम्ही तुम्हाला ज्या ट्रिकविषयी सांगत आहोत त्याचे अनुसरण करून तुम्ही अवघ्या काही दिवसांतच तुमच्या कॅन्सल तिकिटाचे रिफंड मिळवू शकता.
हेदेखील वाचा – गुजरातमध्ये पाहायला मिळेल भारतातील पहिली बुलेट ट्रेन, विमानतळालाही लाजवेल असा फर्स्ट लूक, पाहून व्हाल हैराण
प्रवासाच्या काही तास आधी बुकिंग करण्याचे नियम
प्रवाशांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, जर तुम्ही प्रवासाच्या एक दिवस आधी तुमचे ट्रेनचे तिकीट कॅन्सल केले तर तुम्हाला नक्कीच रिफंड मिळू शकेल. यामध्ये तुमचे तिकीट कन्फर्म असो वा वेटिंगमध्ये असो, भारतीय रेल्वे तिकीट कॅन्सल केल्यानंतर त्याचे रिफंड निश्चितच देते. पण यासाठी काही नियम आहेत, जसे की जर तुम्ही प्रवासाच्या काही तास आधी तिकीट बुक केले तर अनेक ट्रेनमध्ये तुम्हाला रिफंड दिला जाणार नाही. तुम्ही तिकीट कॅन्सल करण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला रिफंड मिळेल की नाही हे नोटिफिकेशनद्वारे कळवले जाते.
नोटिफिकेशनद्वारे समजेल किती रिफंड मिळेल
तुम्ही वेटिंग तिकीट कॅन्सल केले तरीही तुम्हाला रिफंडबाबत सूचना मिळेल, जी तुम्हाला किती रिफंड मिळेल याविषयी सांगेल. अनेकदा लोक याकडे लक्ष देत नाहीत, ज्यामुळे रिफंड मिळण्यास विलंब होतो.
हेदेखील वाचा – हे देश जगाच्या नकाशावर कधीही दिसणार नाहीत, त्यामागचे कारण काय ते जाणून घ्या
इतक्या दिवसांत दिला जाईल रिफंड
तिकीट कॅन्सल केल्यास, 4 ते 7 दिवसात पैसे परत केले जातात, परंतु जर दिवस उलटून गेले आणि तरीही तुम्हाला रिफंड मिळाला नाही, तर तुम्ही त्यासाठी तक्रार दाखल करू शकता. प्रवाशांना तिकीट रद्द केल्यावर परतावा मिळत नाही, असे अनेक वेळा घडते. हे लक्षात ठेवा की प्रतीक्षा तिकीट कॅन्सल केल्यास, तुमचे बुकिंग चार्ज कापले जाईल. बुकिंगच्या वेळी बुकिंग चार्ज घेतले जाते. ट्रेन तिकीट कॅन्सल करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे, परंतु यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.
या नंबरवर करा तक्रार
कॅन्सल तिकिटाचे रिफंड मिळवण्यासाठी तुम्ही प्रथम नोंदणीकृत मोबाइल क्रमांक 139 वर कॉल करा, याशिवाय तुम्ही 011-39340000 या क्रमांकावर कॉल करून तक्रार करू शकता. यानंतरही, तुम्हाला काही अडचण आल्यास, तुम्ही भारतीय रेल्वेला care@irctc.co.in वर ईमेल करू शकता. लक्षात ठेवा प्रत्येक तिकिटावर तिकीट कॅन्सलेशन फीजद्यावी लागते.