Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Scotland: हे हिल स्टेशन म्हणजे ‘भारताचे स्कॉटलँड’, उन्हाळ्यात भेट देण्यासासाठी सर्वोत्तम ठिकाण

Summer Travel: उन्हाळा ऋतू सुरु झाला आहे, अशात बहुतेक लोक शिमला, मनाली किंवा नैनितालकडे जातात. पण भारतात एक असे हिल स्टेशन आहे जे सौंदर्यात या सर्वांना मागे टाकते, याला भारताचे स्कॉटलँड असे म्हटले जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 09, 2025 | 08:31 AM
Indian Scotland: हे हिल स्टेशन म्हणजे 'भारताचे स्कॉटलँड', उन्हाळ्यात भेट देण्यासासाठी सर्वोत्तम ठिकाण

Indian Scotland: हे हिल स्टेशन म्हणजे 'भारताचे स्कॉटलँड', उन्हाळ्यात भेट देण्यासासाठी सर्वोत्तम ठिकाण

Follow Us
Follow Us:

सध्या उन्हाळ्याचा ऋतू सुरु आहे. उन्हाळ्याच्या या कडक वातावरणात अनेकजण कोणत्या ना कोणत्या थंड ठिकाणाला भेट देण्याचा प्लॅन बनवत असतात. शिवाय याच सीजनमध्ये लहान मुलांना सुट्ट्या देखील सुरु होतात, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा आणि एकत्र वेळ घालवण्याचा हा एक उत्तम काळ आहे. अशात तुम्हीही जर तुमच्या कुटुंबासह कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास ठिकाण घेऊन आलो आहोत, या ठिकाणाला भारतचे स्कॉटलँड असे म्हटले जाते. हे एक थंड हवेचे ठिकाण आहे…

वरून गाड्या जाणार तर खालून जाणार जहाज! अभियंत्यांचा अनोखा चमत्कार; लवकरच खुले होणार वर्टिकल-लिफ्ट सी पम्बन ब्रिज

स्कॉटलँड किती सुंदर आहे हे संपूर्ण जगाला ठाऊक आहे. युरोपमधील युनायटेड किंग्डम इथे वसलेले हे ठिकाण दरवर्षी अनेक परदेशी पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करते मात्र इथे जाणे काही सोपे नाही. यासाठी तुम्हाला भारीभक्कम रक्कम मोजावी लागेल अशात आम्ही तुम्हाला सांगतो की, स्कॉटलँडच्या सुंदर दृश्यांचा आनंद तर तुम्ही भारतात देखील घेऊ शकता. भारतात असे एक ठिकाण आहे जे स्कॉटलँड च्या सौंदर्याशी स्पर्धा करते. आपण कर्नाटकातील कूर्गबद्दल बोलत आहोत. कूर्ग हे नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असलेले एक हिल स्टेशन आहे, ज्याला ‘भारताचे स्कॉटलंड’ असेही म्हणतात. येथील हिरवळ, थंड वारा, कॉफीचे मळे आणि उंच पर्वत यामुळे उन्हाळ्यात भेट देण्यासाठी हे एक परिपूर्ण ठिकाण आहे. उन्हाळ्यात कुर्ग का परिपूर्ण आहे. चला या ठिकाणाची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

उन्हाळ्यात पर्यटनासाठी उत्तम ठिकाण

उन्हाळ्यात कूर्गमधील तापमान १५°C ते ३५°C दरम्यान असते, ज्यामुळे कडक उष्णतेपासून आराम मिळतो. येथील थंड वारा आणि हलका पाऊस हवामान आणखी आल्हाददायक बनवतो. कुर्ग हे हिरवळीने वेढलेले जंगले, धबधबे आणि कॉफीच्या मळ्यांनी वेढलेले आहे. उन्हाळ्यात दऱ्या आणखी फुलतात, ज्यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग बनते. उन्हाळ्यात कूर्गमध्ये पर्यटकांची संख्या पावसाळा आणि हिवाळ्याच्या तुलनेत कमी असते, त्यामुळे याकाळात इथे भेट दिलीत तर तुम्हाला शांततेचा अनुभव घेता येईल.

कूर्गची खासियत

  • अब्बी धबधबा- हा सुंदर धबधबा कूर्गमधील मडिकेरी शहराजवळ वसलेला आहे. येथील पाण्याचे वाहणारे झरे आणि हिरवळ मनाला शांती देऊन जाते
  • राजाचे आसन – मडिकेरी येथे स्थित, हे दृश्य बिंदू सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी सर्वोत्तम आहे. असे म्हटले जाते की कोडगूचे राजे येथे येऊन विश्रांती घेत असत
  • तलकावेरी- हे पवित्र स्थान कावेरी नदीचे उगमस्थान आहे आणि हिंदू धर्मात त्याला विशेष महत्त्व आहे
    निसर्गधाम हत्ती कॅम्प – येथे तुम्ही हत्तींसोबत वेळ घालवू शकता आणि जंगल सफारीचा आनंद घेऊ शकता
कॉफीचे मळे आणि स्थानिक चवी

कूर्ग त्याच्या कॉफीसाठी प्रसिद्ध आहे. येथील कॉफी इस्टेटला भेट देऊन, तुम्ही कॉफी बीन्सची लागवड आणि प्रक्रिया याबद्दल जाणून घेऊ शकता. याशिवाय, येथील पांडी करी, अक्की रोटी (तांदळाची भाकरी) आणि कूर्ग कॉफी फार लोकप्रिय आहे. तुम्ही इथे जात असाल तर या पदार्थांचा आस्वाद घ्यायला विसरू नका.

एडवेंचर एक्टिविटीजची घेता येईल मजा

ताडीकोलू, कोटेबेट्टा आणि नीलाकुरिंजी टेकड्यांमध्ये तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. याशिवाय बारापोल नदीवर तुम्हाला राफ्टिंगची मजा लुटता येईल. हारंगी आणि कावेरी नदीच्या काठावर कॅम्पिंगची सुविधा देखील उपलब्ध आहे. कूर्गची कोडावा संस्कृती खूप अद्वितीय आहे. येथील प्रसिद्ध सण “कैलपोधू” (कापणी उत्सव) आणि “पुथारी” मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. तुम्ही या उत्सवांमध्ये सामील होऊन त्यांची मजा लुटू शकता.

Web Title: This hill station is the scotland of india the best place to visit in summer travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 08:28 AM

Topics:  

  • Tourist Place
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

Travel News : बजेट आणि वाइब्समध्ये सर्वोत्तम ठरतात जगातील ही 4 ठिकाणे
1

Travel News : बजेट आणि वाइब्समध्ये सर्वोत्तम ठरतात जगातील ही 4 ठिकाणे

Swiggy CREW ची ट्रॅव्हल क्षेत्रात एन्ट्री; भारतातील पहिले ‘Always-On Travel Concierge’ App लॉन्च
2

Swiggy CREW ची ट्रॅव्हल क्षेत्रात एन्ट्री; भारतातील पहिले ‘Always-On Travel Concierge’ App लॉन्च

Travel News : भारतीय पर्यटकाने दाखवले ओमानचे अद्भुत सौंदर्य, 400 वर्षे जुनी कहाणी
3

Travel News : भारतीय पर्यटकाने दाखवले ओमानचे अद्भुत सौंदर्य, 400 वर्षे जुनी कहाणी

जन्माष्टमीला मथुरा-वृंदावनाला जात असाल तर या 4 ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका
4

जन्माष्टमीला मथुरा-वृंदावनाला जात असाल तर या 4 ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.