Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Valentine Day 2025: शेवटच्‍या क्षणी व्‍हॅलेंटाइन्‍स डेचे नियोजन करत आहात? या टिप्‍ससह करा व्हेकेशन प्लॅनिंग

Valentine Day Travel: तुम्हीही आपल्या पार्टनरसह कुठे तरी फिरायला जाण्याचा विचार करताय? मग लास्ट मिनिट व्हेकेशनच्या या टिप्स तुमच्या कामी येतील. यांच्या मदतीने कमी वेळातच तुम्ही तुमची ट्रिप संस्‍मरणीय बनवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 14, 2025 | 11:59 AM
Valentine Day 2025: शेवटच्‍या क्षणी व्‍हॅलेंटाइन्‍स डेचे नियोजन करत आहात? या टिप्‍ससह करा व्हेकेशन प्लॅनिंग

Valentine Day 2025: शेवटच्‍या क्षणी व्‍हॅलेंटाइन्‍स डेचे नियोजन करत आहात? या टिप्‍ससह करा व्हेकेशन प्लॅनिंग

Follow Us
Close
Follow Us:

व्हॅलेंटाइन्स वीकचा आजचा शेवटचा दिवस. हा संपूर्ण आठवडा कसा निघून गेला कुणाला समजलंच नाही. या प्रेमाच्या आठवड्यात जोडपे आपल्या पार्टनरसह अनेक वेगवेगळे प्लॅन्स करतात. या निमित्ताने लोकांना आपल्या प्रेमाची कबुली देण्याची संधी मिळते तसेच आपल्या पार्टनरसह वेळ घालवण्याची आणि प्रेमाचे हे नाते आणखीन घट्ट करण्याची संधी प्राप्त होते. म्हणूनच या दिवसाला एक विशेष महत्त्व असून जगभरात हा वीक साजरा केला जातो.

अनेकजण यानिमित्त आपल्या पार्टनरसह कुठे बाहेर फिरायला जाण्याचाही प्लॅन करत असतात. अशात तुम्हीही असाच काहीसा विचार केला असेल पण नियोजनासाठी जर तुमच्याकडे फारसा वेळ शिल्लक नसेल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची ठरेल. परिपूर्ण व्‍हॅलेंटाइन्‍स डे गेटवेचे नियोजन करण्‍यासाठी वेळ नाही आहे का? मग चिंता सोडा आणि आम्ही सांगत असलेल्या टिप्सचे पालन करा.

या 5 ठिकाणी होतो दैवी शक्तींचा आभास; गजबजाटापासून दूर इथल्या शांततेत घालवता येतील सुंदर क्षण

कमी ज्ञात ठिकाणे निवडा

नेहमीची, गर्दीची पर्यटन स्थळे सोडून कमी लोकप्रिय असलेली ठिकाणे निवडा. अज्ञात ठिकाणांचा शोध घ्‍या, जी सहसा अधिक उत्‍साहवर्धक अनुभव देतात आणि परवडणारीही ठरतात, यामुळे प्रवास आणि निवास या दोन्‍ही बाबींसंदर्भात बचत होईल.

जोडप्यांसाठी असलेल्‍या ऑफर्स शोधा

अनेक ठिकाणी जोडप्यांसाठी रोमँटिक पॅकेजेस उपलब्ध असतात, ज्यामध्‍ये जेवण, ऍक्टिव्हिटीज आणि अनोखे अनुभव यांचा समावेश असतो. हे पॅकेजेस् उत्तम मूल्‍य देऊ शकतात, अतिरिक्त खर्च न करता तुम्हाला कायमस्वरूपी आठवणींचा संग्रह करण्यास मदत करतात.

बचत वाढवण्यासाठी क्रेडिट कार्ड रिवॉर्ड्स वापरा

प्रवासाला अधिक बजेट-अनुकूल बनवण्यासाठी प्रवासाशी संबंधित खर्चासाठी तुमच्या व्हिसा कार्डवरील विशेष ऑफर, जसे बोनस पॉइण्‍ट्स किंवा कॅशबॅकचा फायदा घ्या!

पर्यायी निवास पर्यायांचा विचार करा

हॉटेल बुक करण्याऐवजी व्‍हेकेशन रेण्‍टल्‍स किंवा खाजगी रूम्‍स असलेल्‍या हॉस्‍टेल्‍सचा विचार करा. हे बहुतेकदा खिशाला अधिक परवडणारे असू शकतात आणि तुम्‍हाला व तुमच्‍या जोडीदाराला अनोखा अनुभव देऊ शकतात.

स्वर्गापेक्षाही सुंदर या ठिकाणी मिळेल मानसिक शांती, राहण्याचा-जेवणाचा खर्च 1 हजाराहून कमी

सोप्या पेमेंटसाठी कॉन्टॅक्टलेस पेमेंट्स वापरा

तुम्ही स्टोअरमध्ये प्रत्‍यक्ष पेमेंट करत असाल तर कॉन्टॅक्टलेस कार्ड पेमेंट्सचा वापर करा. ते जलद, सुरक्षित आहेत, ज्‍यामुळे तुमचे प्री-ट्रिप खर्च व्यवस्थापित करणे सोपे होते. प्रेमासाठी मोठी किंमत मोजावी लागत नाही! या टिप्ससह, तुम्‍ही शेवटच्‍या क्षणी नियोजन केलेला व्हॅलेंटाईन डे किफायतशीर आणि संस्‍मरणीय बनवू शकता.

Web Title: Valentine day 2025 are you planning a last minute trip get started on vacation planning with these tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2025 | 11:59 AM

Topics:  

  • travel news
  • travel tips
  • Valentine Day

संबंधित बातम्या

नववर्षाचा सर्वात पहिला सूर्य देशाच्या या भागात उगवणार… कस जायचं? जाणून घ्या
1

नववर्षाचा सर्वात पहिला सूर्य देशाच्या या भागात उगवणार… कस जायचं? जाणून घ्या

नववर्षाची सुरुवात करा रामाच्या दर्शनाने…IRCTC घेऊन आला बजेट फ्रेंडली पॅकेज
2

नववर्षाची सुरुवात करा रामाच्या दर्शनाने…IRCTC घेऊन आला बजेट फ्रेंडली पॅकेज

Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील नव्याने विकसित होणारी पर्यटनस्थळे बनतायत पर्यटकांची नवी पसंती
3

Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील नव्याने विकसित होणारी पर्यटनस्थळे बनतायत पर्यटकांची नवी पसंती

भारतातील 5 रहस्यमय मंदिर जिथला प्रसाद खाणं किंवा घरी घेऊन जाणं मानलं जात अशुभ; नक्की कारण काय?
4

भारतातील 5 रहस्यमय मंदिर जिथला प्रसाद खाणं किंवा घरी घेऊन जाणं मानलं जात अशुभ; नक्की कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.