मुंबई. १९७८ सालापासून मराठी रंगभूमी गाजविणारे ज्येष्ठ कलाकार अविनाश खर्शीकर यांचे आज हृदय विकाराच्या धक्याने निधन झाले (avinash kharshikar passes away) . अविनाश खर्शीकर यांनी चित्रपट, मालिका, रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केले आहे. त्यांच्या अनेक नाटकांना रसिकांची पसंती मिळाली आहे.
[read_also content=”आज वायुसेनेचा ८८ वा स्थापना दिवस; पंतप्रधानांसह राष्ट्रपतींनीही दिल्या शुभेच्छा https://www.navarashtra.com/uncategorized/today-is-the-88th-air-force-day-the-prime-minister-and-the-president-also-gave-their-best-wishes-37274.html”]
अविनाश खर्शीकर यांनी १९७८ ला बंदिवान मी या संसारी या चित्रपटाद्वारे त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी जसा बाप तशी पोरं, आधार, आई थोर तुझे उपकार, माझा नवरा तुझी बायको, चालू नवरा भोळी बायको, बकुळा नामदेव घोटाळे, घायाळ, लपवाछपवी, माफीचा साक्षीदार यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. तुझं आहे तुजपाशी, सौजन्याची ऐशी तैशी, वासूची सासू, अपराध मीच केला, दिवा जळू दे सारी रात, लफडा सदन ही त्यांची नाटकं तर प्रचंड गाजली.
[read_also content=”फक्त ‘या’ दोन दोन गोष्टींचे सेवन केल्यास वाढेल शारीरिक बळ आणि लैंगिक इच्छा https://www.navarashtra.com/latest-news/consumption-of-only-these-two-things-will-increase-physical-strength-and-desire-36980.html”]
दामिनी या पहिल्या दैनंदिन मालिकेत अविनाश खर्शीकर यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.