मुंबईतील आझाद मैदानावर रविवारी मराठा आरक्षण समर्थकांची मोठी गर्दी उसळली. बीएमसीजवळ आरक्षणाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. आंदोलकांसाठी मैदानात जेवणाची सोय करण्यात आली असली तरी वाढत्या गर्दीमुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. त्यामुळे अनेक मुंबईकरांनी या भागाकडे पाठ फिरवली. सोमवारी आणखी मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.