मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आझाद मैदान, मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलनाला सतत समाजाचा पाठिंबा मिळत आहे. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांसाठी अन्न-पाण्याची सोय व्हावी यासाठी कल्याणमधील सकल मराठा समाज मराठा सेनेकडून पुढाकार घेण्यात आला. कार्यकर्त्यांनी जेवण आणि पाण्याने भरलेला टेम्पो मुंबईच्या दिशेने रवाना केला आहे. “जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील,” असा निर्धार करत समाजबांधवांनी एकात्मतेचे दर्शन घडवले आहे.