राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी प्रभाग रचना आणि आरक्षणावरून स्थानिक पातळीवर राजकारण चांगलेच पेटले आहे. महानगरपालिकांच्या प्रभाग रचनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र संघर्ष पाहायला मिळत आहे. सत्ताधारी पक्ष आपल्या सोयीनुसार प्रभाग रचना करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला असून, यामुळे निवडणुकांचा घाट कशाला, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना नुकतीच प्रसिद्ध झाली. या प्रभाग रचनेवर प्रशासनाकडे एकूण ४३ हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी केवळ एकच हरकत अंशतः मान्य करून प्रशासनाने इतर सर्व हरकती फेटाळून लावल्या.