(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
एल्विश यादव हा प्रसिद्ध यूट्यूबर असला तरी, काही काळापासून तो टिव्हीच्या जगात सक्रिय झाले आहे. एल्विश अनेक रिअॅलिटी शोचा भाग बनत आहे आणि त्याचबरोबर, तो विविध टिव्ही अभिनेत्रींसबोत म्युझिक व्हिडिओंमध्ये रोमांस करत आहेत. मात्र, एल्विशचा नवीन व्हिडिओ पाहून सर्वांनाच धक्का बसला. या व्हिडिओमध्ये तो टिव्हीच्या सुंदर अभिनेत्री शिवांगी जोशीसोबत रोमांस करताना दिसत आहेत. शिवांगी आणि एल्विशच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांचे हृदय जिंकले आहे.
शिवांगी जोशी आणि एल्विश यादव लवकरच एक रीलमध्ये दिसणार आहेत, ज्यात “एक दीवाने की दीवानियत” या चित्रपटाच्या टाईटल ट्रॅक “हम बस तेरे हैं” गाण्याचा वापर करण्यात आला आहे. हे गाणं 21 ऑक्टोबर, म्हणजेच आज रिलीज झालं आहे. एल्विश आणि शिवांगी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर या व्हिडिओची झलक शेअर केली, ज्यामुळे त्यांच्या फॅन्समध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
‘तारक मेहता’मधील गुरुचरण सिंह सोढ़ीने ने दिली खुशखबर! नवीन काम केलं सुरू , लोक विचारत आहेत लोकेशन
या व्हिडिओमध्ये, शिवांगी आणि एल्विशची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. त्यांना समुद्र किनारी एकत्र बसत आणि एकमेकांच्या छोट्या छोट्या क्यूट मोमेंट्सचा आनंद घेताना दिसत आहे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात रंगलेले आहेत आणि व्हिडिओमधून त्यांच्या आनंदाची स्पष्ट झलक मिळते.
फॅन्स एल्विश यादव आणि शिवांगी जोशीचं व्हिडिओ पाहून खूप आनंदित झाले आहेत. फॅन्ससाठी दोघांना एकत्र पाहणं दिवाळी गिफ्टसारखं आहे. सोशल मीडियावर प्रत्येकजण दोघांची प्रशंसा करत आहे. अनेक फॅन्सनी लिहिलं आहे, ‘अपेक्षेपेक्षा वेगळं कोलॅब.’ एका फॅनने लिहिलं, ‘माझी आवडती अभिनेत्री आणि माझा भाऊ.’ याशिवाय, फॅन्स आता दोघांना एकत्र एखाद्या म्युझिक व्हिडिओमध्ये पाहण्याची मागणी करत आहेत.
‘Thamma’ नंतर, लगेच येणार ‘Shakti Shalini’, अनित पड्डा मुख्य भूमिकेत; चित्रपट कधी होणार रीलीज?
एल्विश यादव एक यूट्यूबवर प्रसिद्ध असलेला भारतीय यूट्यूबर आहे. तो मजेदार आणि हसवणारे व्हिडिओ बनवतो, ज्यामुळे त्याला खूप लोकं पसंत करतात. त्याचे व्हिडिओ, फनी चैलेंजेस, मिम्स आणि ट्रेंड्सवर आधारित असतात.