अहिल्यानगरमध्ये 79 वर्षीय वृद्धाच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या दोन डॉक्टरांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. कोरोनाच्या काळात खोटा रिपोर्ट बनवून चुकीचा उपचार केल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सहा डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीत दोन्ही डॉक्टरांचा तात्पुरता अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला. आता या प्रकरणातील सर्व आरोपी डॉक्टरांवर अटकेची कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फिर्यादीकडून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली असून, पोलिसांनी कारवाई न केल्यास ठिय्या आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.