राज्यात पावसाची हजेरी (फोटो- सोशल मिडिया)
राज्यात अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी
मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरूवात
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ
सध्या सगळीकडे दिवाळीचा उत्साह आहे. आज सर्वत्र लक्ष्मीपूजन संपन्न होत आहे. दरम्यान आज लक्ष्मीपुजनाला वरुणराजाने देखील हजेरी लावली आहे. गेले दोन ते तीन दिवस राज्यात उकाडा वाढला होता. तसेच पावसासाठी पोषक हवामान देखील तयार झाले होते. आज संध्याकाळच्या सुमारास पावसाने राज्यातील अनेक भागात हजेरी लावली आहे.
पावसाने मुंबईसह राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. ऐन दिवाळीत आलेल्या पावसामुळे खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. फटाके विक्रेत्यांचे देखील मोठे नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि राज्यातील अनेक भागात वरूणराजाने हजेरी लावली आहे. मुंबईमध्ये देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
काळ बनून येतोय चक्रीवादळ! पुढील २४ तासांत ११ राज्यांवर कोसळणार
मान्सून भारतात परतला असला तरी हवामानाचा प्रकोप अजून संपलेला नाही. हा आठवडा अनेक राज्यांसाठी धोकादायक ठरू शकतो. हवामान खात्याने चक्रीवादळाचा इशारा जारी केला आहे, ज्यामुळे किनारी भाग तसेच अंतर्गत राज्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने (IMD) बंगालच्या उपसागरावरील अंदमान आणि निकोबार बेटांसाठी चक्रीवादळाचा इशारा जारी केला आहे, जो आजपासून तीव्र होण्याची अपेक्षा आहे. त्यात म्हटले आहे की २३ ऑक्टोबरपर्यंत प्रभावित भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. इशारा जारी होताच स्थानिक बंदरे रिकामी करण्यास सुरुवात झाली.
आयएमडीने म्हटले आहे की चक्रीवादळाचा परिणाम दक्षिण द्वीपकल्पापासून पूर्व, ईशान्य, मध्य भारत, पश्चिम भारत आणि उत्तर भारतापर्यंत पसरेल. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, महाराष्ट्र, छत्तीसगड, गोवा, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये हे चक्रीवादळ जाणवेल.
अंदमान आणि निकोबार बेटांपासून सुरुवात करून, चक्रीवादळ केरळमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर, ते राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा आणि हिमाचल प्रदेशमध्ये विनाश घडवू शकते. हवामान खात्याने सांगितले की, २१, २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पश्चिम भारतात, कोकण आणि गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांत विजांसह गडगडाटी वादळ होण्याची शक्यता आहे. शिवाय, उत्तर भारतात, जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात विजांसह गडगडाटी वादळ होण्याची शक्यता आहे.