साध्या घशाच्या त्रासासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या ७९ वर्षीय वृद्धाला, कोरोना पॉझिटिव्ह नसतानाही खोटे रिपोर्ट बनवून, चुकीचे उपचार देऊन मारल्याचा आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची परस्पर विल्हेवाट अहिल्यानगर शहरातील प्रतिष्ठित डॉक्टरांच्या कारभारावर ताशेरे ओढत तब्बल ५ वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाने तोफखाना पोलिस ठाण्यात शहरातील ६ नामांकित डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात डॉक्टरांवर लावण्यात आलेल्या कलमांविरोधात ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन नगर संघटनेने आक्षेप घेतला असून आयएमए संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच शहरातील प्रतिष्ठित डॉक्टरांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन डॉक्टरांविरोधात लावण्यात आलेल्या कलमांपैकी काही कलमे जाचक असून ही कलमे योग्य तपास करुन गुन्ह्यातून वगळावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच ही कलमे वगळली नाहीत तर संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील आयएमएच्या वतीने देण्यात आला आहे.