सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी गवताळ संरक्षित वन क्षेत्रात एक अभूतपूर्व आणि अत्यंत महत्त्वाचा पुरातात्विक शोध लागला आहे. येथे सापडलेला 15-सर्किटचा वर्तुळाकार दगडी चक्रव्यूह हा आतापर्यंत भारतात आढळलेल्या चक्रव्यूहांमध्ये सर्वात मोठा असल्याचे पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. या दुर्मिळ रचनेचे ड्रोन फूटेज ड्रोन पायलट भरत छेडा यांनी तयार केले असून सध्या ते चर्चेत आहे.ग्रेट इंडियन बस्टर्ड आणि लांडग्यांचे निरीक्षण करण्यासाठी गेलेल्या नेचर कन्झर्वेशन सर्कलच्या सदस्यांना ही रचना प्रथम दिसली. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीत 17 डिसेंबर रोजी या चक्राकार संरचनेबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली. लहान दगडी गोट्या आणि 1ते1.5 इंच उंच मातीचा थर वापरून हा चक्रव्यूह तयार करण्यात आल्याचे समजते