लीबियाच्या आर्मी चीफच्या मृत्यूमागे पाकिस्तान-तुर्कीचा हात? सत्तेसाठी आंतरराष्ट्रीय डावपेच (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
लीबियाला मोठा धक्का! तुर्कीत विमान अपघातात आर्मी चीफसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू
अंकारा येथील एसेनबोगा विमानतळाजवळ हा अपघात घडला होता. विमान ४० मिनिटांवरुन रडारवर गायब झाले होते. गायब होण्यापूर्वी विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे एअर ट्राफिक कंट्रोल सांगण्यात आले होते. यामुळे इमरजन्सी लँडिंगची मागणी करण्यात आली होती. मात्र रडारवरुन विमान गायब झाल्यामुळे एअर ट्राफिक कंट्रोलशी संपर्क तुटला आणि विमानाचा अपघात झाला. दरम्यान या घटनेच्या काही दिवसांपूर्वी अंकारा ते त्रिपोलीदरम्यान काही घटना घडल्या होत्या. या घटना सत्ता संघर्षाकडे संकेत देत असल्याचे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी म्हटले आहे.
लीबीया हा उत्तर आफ्रिकेतील तेल संपन्न आणि धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा देश आहे. लीबीयात मुअम्मर गद्दाफीच्या हत्येनंतर देश दोन भागात विभागला गेला आहे. यातील राजधानी त्रिपोलावर नॅशनल आर्मीचा ताबा होता, तर बेंगाझी आणि आसपासच्या परिसरावर खलिफा हफ्तारच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय सेनेचा होता. आर्मी चीफ जनरल मुहम्मद अली अहमद अल-हद्दाद हेनॅशल आर्मीचे प्रमुख होते, तर हफ्तार यांचा मुलगा सद्दा हफ्तार राष्ट्रीय सेनेचा प्रमुख होता.
दरम्यान २०१९ मध्ये गृहयुद्धाच्या काळात तुर्कीने नॅशनल आर्मीला पाठिंबा दिला होता. तुर्कीने सैन्य आणि युद्धनौका लीबीयाजवळ तैनात केले होते. यामुळे युद्धात तुर्कीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. परंतु गेल्या काही काळात तुर्की आणि नॅशनल आर्मीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. नॅशनल आर्मीतील तुर्की सैन्याने लीबीया सोडावे अशा मागणी केली जात असून याविरोधात कायदेशीर पावले उचलण्याचे संकेत देखील मिळाले आहेत.
या सर्व घडामोडींदरम्यान तुर्कीने लीबीयाई राष्ट्रीय सैन्यासोबत हफ्तापर गटाशी करार केला होता. यामुळे लीबियाचे नॅशनल आर्मी आणि तुर्कीत तणाव वाढला आहे. २१ डिसेंबर २०२५ रोजी तुर्कीचे संरक्षण मंत्री बेनगाझीला गेले होते. यावेळी त्यांनी हफ्तार गटाशी चर्चा केली आणि लष्करी सहकार्याचा करार केला. या करारानंतरच तुर्की आणि लीबीयाच्या नॅशनल आर्मीमध्ये तणाव वाढला.
दरम्यान तुर्कीच्या लीबीयाच्या राष्ट्रीय सेनेच्या हफ्तार गटाशी करारानंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर (Asim Munir) यांनी लीबीयाला भेट दिली होती. या भेटीत त्यांनी सद्दाम हफ्तार यांची भेट घेतली आणि यावेळी पाकिस्तान (Pakistan) आणि हफ्तार गटासोबत ४ अब्ज डॉलर्सचा शश्त्रास्त्र करार करण्यात आला. शिवाय पाकिस्तान आणि तुर्की हे दोन्ही मित्र देश आहेत. या कारणांमुळेत नॅशनल आर्मी चीफ जनरल मुहम्मद अली अहमद अल-हद्दाद यांच्या मृत्यूमागे पाकिस्तान-तुर्कीचा हात असल्याचा संशय तज्ञांनी व्यक्त केला आहे.
Epstein च्या घराचे धक्कादायक वास्तव! सर्वत्र लटकवलेत अल्पवयीन मुलांचे अश्लील फोटो






