स्वस्तिक सामलने द्विशतक ठोकले(फोटो-सोशल मीडिया)
Swastik Samal scores a double century in the Vijay Hazare Trophy : ओडिशाच्या स्वस्तिक सामलने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत इतिहास रचला आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या हंगामातील पहिल्याच दिवशी अलूरच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या सौराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात १६९ चेंडूत २१२धावांची वादळी खेळी केली. या खेळीसह लिस्ट-ए क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात ओडिशाकडून द्विशतक झळकावणारा तो पहिलाच फलंदाज बनला आहे.
अनकॅप्ड आणि आयपीएल लिलावात खरेदी न झालेला स्वत्विक सामल याने सौराष्ट विरुद्धच्या सामन्यात विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासात सर्वोच्च वैयक्तिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतील यशस्वी जैस्वालला पिछाडीवर टाकले आहे. तसेच त्याने आता टॉप ५ मध्ये एन्ट्री मारली आहे. भारतीय युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने २०१९ च्या हंगामात मुंबई संघाकडून खेळताना झारखंडविरुद्ध २०३ धावांची खेळी केली होती. त्याला मागे टाकत सात्विकने संजू सॅमसनची बरोबरी करण्याचा डाव साधला आहे. आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावात स्वत्विक सालमने ३० लाख या मूळ किंमतीसह नाव नोंदणी केली होती. परंतुम, त्याला कुणीच खरेदी केले नव्हते.
हेही वाचा : IND VS SA : ‘गोष्टी सहजासहजी विसरल्या जात नाहीत…’ बूमराहच्या ‘बुटका’ संबोधनावर टेम्बा बावुमाने सोडले मौन
ओडिशाच्या डावाची सुरुवात २५ वर्षीय फलंदाजाने केली. परंतु, पण तीन फलंदाज झटपट बाद झाले आणि ओडिशा संघाची अवस्था ११.५ षटकानंतर ३ बाद ५९ अशी बिकट झाली होती. तेव्हा संघ अडचणीत असताना या पठ्ठ्यानं फक्त डाव सावरला आणि विक्रमी द्विशतकासह सामना अविस्मरणीय देखील बनवला. सामलने कर्णधार बिप्लब सामंतरायसोबत संघाचा सावरला. या दोघांनी मिळून २११ चेंडूत २६१ धावांची भागीदारी केली. कर्णधाराच्या शतकाशिवाय सालमनं द्विशतकाच्या जोरावर ओडिशाच्या संघाने निर्धारित ५० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात ३४५ धावांचा डोंगर उभा केला. सौराष्ट्र संघाने या धावांचा यशस्वी पाठलाग करून सामना जिंकला. तरी स्वस्तिक सामलचे द्विशतक लक्ष्यात राहिले.






