रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली बांधतिवरे धबधबा म्हणजे निसर्गाची मुक्तहस्ते उधळण . नयन रम्य दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी अनेकजण या धबधब्याकडे आकर्षित होतात. आजूबाजूला गर्द हिरवी झाडे, काळया कातळातून फेसाळत पडणारे पांढरे शुभ्र पाणी असे खास वैशिष्ट्य असलेला धबधबा म्हणजेच निसर्गाचा अविष्कार लाभलेला बांधतिवरेचा धबधबा. दापोली शहरापासून अगदी सात किलोमीटर वर असलेल्या या धबधब्याचे अनेक पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरातील धो धो कोसळणाऱ्या या धबधब्याचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी अनेक जण येत असतात. पाहा व्हिडिओ (फोटो सौजन्य – विजय बासुतकर)