बीड जिल्ह्यात दुष्काळाच्या तीव्रतेमुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. शेतात पिकं न आल्याने काही शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी शहरात जाऊन मजुरी करण्याची वेळ आली आहे. सरकारने जाहीर केलेल्या पाच हजार रुपयांच्या मदतीत दिवाळी कशी साजरी करायची, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. केवळ आर्थिक मदत न देता दुष्काळावर मात करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.