खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला (फोटो- सोशल मीडिया/ट्विटर)
पुणे: पुणे जिल्ह्यासह शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुणे शहर व उपनगरात जोरदार पाऊस सुरु आहे. दरम्यान धनकवडी, पुणे सातारा रस्ता, सिंहगड रस्ता यासह अन्य महत्वाच्या भागात नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. दरम्यान पानशेत, टेमघर, वरसगाव व खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटींग सुरु आहे. खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात ३९ हजार १३८ क्युसेकने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलस्तर वाढला आहे.मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे. मुठा नदीपात्रात विसर्ग सुरु करण्यात आल्याने नदीपात्र वाहतुकीस बंद झाला आहे.
नदीपात्र वाहतुकीस बंद झाल्याने मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. सिंहगड रस्ता, जंगली महाराज रस्ता यासह पुण्यातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान पुणे जिल्ह्यतील सात मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याचे समोर आले आहे. जिल्यात असणाऱ्या एकूण धरणांपैकी काही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना नदीकाठच्या रस्त्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, पुणे आणि परिसरातील घाटमाथ्यांवर जोरदार पावसाची नोंद झाली आहे.
#पुणे जिल्ह्यासाठी आज दि.२० ऑगस्ट २०२५ रोजी #येलोअलर्ट दिलेला असून पुढील ३ तासांत जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता.नागरिकांनी खबरदारी घ्यावी-जिल्हा प्रशासनाचे आवाहन. pic.twitter.com/C3ZlkpZOOa
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) August 20, 2025
पुणे जिल्ह्यासाठी आज दि.२० ऑगस्ट २०२५ रोजी येलोअलर्ट दिलेला असून पुढील ३ तासांत जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता.नागरिकांनी खबरदारी घ्यावी
-जिल्हा प्रशासनाचे आवाहन.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून #मुठानदी पात्रामध्ये सुरु असलेल्या निसर्गात सकाळी १० वाजता ३९ हजार १३८ क्युसेक इतकी वाढ करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. खबरदारी घ्यावी.
#खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून #मुठानदी पात्रामध्ये सुरु असलेल्या विसर्गात सकाळी १० वाजता ३९ हजार १३८ क्यूसेक इतकी वाढ करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये. खबरदारी घ्यावी- मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, मुठा कालवे पाटबंधारे उपविभाग, स्वारगेट, पुणे
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) August 20, 2025
मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता,
मुठा कालवे पाटबंधारे उपविभाग,
स्वारगेट, पुणे
घाटमाथ्यावरील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज (दि.२० ऑगस्ट) भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, आंबेगाव, खेड आणि जुन्नर या तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद- @PuneZp चे शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. भाऊसाहेब कारेकर pic.twitter.com/dFd08d7QJk
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) August 20, 2025
शाळांना सुट्टी जाहीर
घाटमाथ्यावरील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज (दि.२० ऑगस्ट) भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, आंबेगाव, खेड आणि जुन्नर या तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद.
डॉ. भाऊसाहेब कारेकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक,
जिल्हा परिषद, पुणे