धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षपासून धनगर समाज रस्त्यावर उतरून संघर्ष करीत आहेत, मात्र भाजप सरकार हे धनगर समाजाला कधीच आरक्षण देणार नाही, ते फक्त मतांपुरता धनगर समाजाचा वापर करीत आहे, अशी टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी भाजप सरकारवर केली आहे माजी मंत्री महादेव जानकर हे खालापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता वावोशी येथील पक्ष कार्यालयात बोलत होते, यावेळी लायन ग्रुपचे अध्यक्ष बाळू फडके यांनी जानकर यांची भेट घेतली. वावोशी येथील परखंडे अहिल्यानगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने उपस्थित राहून महाराजांना अभिवादन करून शिवजयंती साजरी करण्यात आली,तर हेमडी येथे जननी वाघजाई माता मंदिराचे कलश पूजन महादेव जानकर यांच्या हस्ते करण्यात आलं होतं.