डोंबिवलीतील दत्तनगर परिसरातील शेकडो नागरीकांनी भारतीय कम्यूनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढला. क्लस्टर योजने अंतर्गत बाधितांना घरे मिळाली पाहिजेत अशी नागरीकांची मागणी आहे. वांरवार मागणी करुन प्रशासनाकडून लक्ष दिले जात नाही. कोणतीही माहिती दिली जात नाही. योजनेच्या बायोमेट्रीक सर्वेक्षणाकरीता १० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. सर्वेक्षणाचे काम अर्थवट झाले आहे. तसेच सर्वेक्षण झालेल्यांची पडताळणी झालेल नाही. ज्यांची पडताळणी झाली आहे. त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. यादी प्रसिद्ध करण्यात यावी. तसेच ठप्प झालेले सर्वेक्षण पुन्हा सुरु करण्यात यावे.