महायुती आणि महाविकास आघाडीतील अनेक आमदरांना उमेदवारी न मिळाल्याने दोन्ही गटातील अंतर्गत नाराजी उघड झाली. त्यामुळे उमेदवारी न मिळालेल्या आमदरांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. याच पार्श्वभूमीवर अंबरनाथ विधानसभेसाठी सुमेध भवार यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.कोणतेही शक्तिप्रदर्शन न करता भवार यांनी मोजक्याच कार्यकर्त्यांनासोबत उमेदवारी अर्ज भरला. सुमेध भवार हे काँग्रेसमधून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र ही जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेल्याने महाविकास आघाडीकडुन राजेश वानखेडे यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे सुमेध भवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढणार असून काहीही झालं तरी उमेदवारी अर्ज मागे घेणार नसल्याचे भवार यांनी सांगितले आहे.