राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आंदोलनावर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार टीका केली आहे. रोहित पवारांचे आंदोलन हे शेतकऱ्यांच्या हितासाठी नसून केवळ राजकीय स्टंटबाजी असल्याचा आरोप त्यांनी केला. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना गोरे म्हणाले की, राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठे निर्णय घेतले आहेत. कर्जमाफीची अंमलबजावणी ३० जूनपूर्वी होणार असून शेतकरी सरकारचे आभार मानत आहेत. मात्र या निर्णयाचे श्रेय स्वतःकडे घेण्यासाठी रोहित पवार आंदोलन करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी म्हटले. रोहित पवार यांच्यावर टीका करताना गोरे म्हणाले, पुतण्या आणि मावशीचे प्रेम दाखवण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकारण करण्यापेक्षा त्यांच्यासाठी प्रत्यक्ष काम करण्याची गरज आहे. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना विक्रमी मताधिक्य मिळेल, असा विश्वासही जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. महायुतीतील सर्व घटक पक्ष एकदिलाने राऊत यांच्या पाठीशी उभे असल्याचे त्यांनी सांगितले. महायुतीबरोबरच इतर अनेक घटकांचा पाठिंबा आम्हाला मिळत आहे. त्यामुळे राजेंद्र राऊत यांचा विजय निश्चित असून तो विक्रमी मतांनी होईल, असे गोरे म्हणाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यावर टीका करताना त्यांना ‘अमित शहा यांनी ठेवलेल्या दोन कंपन्या’ अशी उपमा दिली होती. यावर प्रतिक्रिया देताना जयकुमार गोरे म्हणाले, संजय राऊत यांना कोणी ठेवले आहे हे देखील विचारा. यापेक्षा अधिक काही बोलणार नाही. लातूर जिल्ह्यातील एका शेतकरी महिलेला दिलेल्या आजारी बैलाच्या प्रकरणावरही गोरे यांनी भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत संवेदनशील नेतृत्व असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणाची माहिती घेतली जाईल आणि संबंधित महिलेला सुदृढ बैल उपलब्ध करून दिला जाईल, असे स्पष्ट केले. .