रत्नागिरी: विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी मतदार संघात २ लाख ८९ हजार ९६४ मतदार आहेत. मतदान नोंदणीसाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. या मतदार संघात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. 85 वर्षाहून अधिक वयाचे साडेआठ हजार मतदार असल्याची माहिती या मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी सांगितले. लवकरच आचारसंहिता लागू होणार आहे त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला ४० लाखाच्या खर्चाची मर्यादा असून उमेदवारांच्या खर्चासह निवडणूक प्रक्रियेवर यंत्रणेचे विशेष लक्ष राहणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.