सह्याद्री सहकारी साखर कारखान्यासाठी इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधाऱ्या विरोधात दोन विरोधी गट अशी तिरंगी लढत होत असून 99 मतदान केंद्रावर मतदानास आज सुरुवात झाली आहे. सत्ताधारी गटाचे विद्यमान चेअरमन माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात भाजप आणि काँग्रेस यांच्यामधील अंतर्गत वादामुळे दोन पॅनल पडले आहेत. भाजपचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील यांचे एक पॅनल असून भाजपचे किसान मोर्चाचे रामकृष्ण वेताळ, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि काँग्रेसचे कराड तालुका अध्यक्ष निवास थोरात यांच्या नेतृत्वात तिसरे पॅनेल उभे आहे.