मालेगावच्या अजंग शिवारात माजी सैनिकांनी एकत्र येत 500 एकरावर सहकारी तत्वावर स्थापन केलेल्या वेंकटेश्वरा फार्मिंग कंपनीला 18 देशाच्या मंत्री तसेच विदेशी सरकारच्या अधिकारी शिष्टमंडळाने भेट अभ्यास दौरा केला.यावेळी व्यंकटेश्वरा फॉर्मचे प्रमुख डॉ.शिवाजीराव डोळे यांनी परदेशी पाहुण्यांचे स्वागत केले.यावेळी शिष्टमंडळाने व्यंकटेश्वरा फार्मिंगच्या सेंद्रिय शेती, माती परीक्षण केंद्र, गिर गाई , पंचगव्य अगरबत्ती, गांडुळ खत प्रकल्प या प्रकल्पांना भेट देत पाहणी केली.एवढ्या मोठ्या प्रमाणावर सहकारी तत्वावर शेती केली जात असल्याचे पाहून परदेशी पाहुण्यांनी कौतुक केले तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या योजनांचीही प्रशंसा केली. व्यंकटेश्वरा फार्मिंगसोबत व्यावसायिक संबंध वाढविण्याबाबत सर्वच देशातील प्रतिनिधींनी सकारात्मकता दर्शविली.वेंकटेश्वरा फॉर्मिंग आदरातिथ्याने परदेशी पाहुणे भारावून गेले.