शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी शेतजमीन मोजण्याकरिता आलेल्या अधिकाऱ्यांना परभणी तालुका जिल्हा परभणी येथील उखळद बाभळी येथील शेतकऱ्यांनी मोजणी न करू देताच परत पाठवले. यावेळी शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत जमीन मोजणीसाठी आलेले अधिकाऱ्यांना आम्ही आमच्या सुपीक जमिनी कुठल्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्गासाठी देणार नाहीत असा लेखी पंचनामा करून शासनाकडे पाठविण्यासाठी भाग पाडले.परभणी जिल्ह्यातील एकूण ७१ किलोमीटरचा शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. या महामार्गामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर सुपीक जमिनी जाणार असून भूसंपादनासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शविला आहे तसेच महाराष्ट्रात 14 ठिकाणी तर चार ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको करून शक्तिपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणावर विरोध केला आहे यावेळी उखळद बाभळी बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.