पिंपरी चिंचवड शहरात तेरा ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल समोर आला अन एकचं खळबळ उडाली. वैद्यकीय विभागाने जीबीएसची लागण झालेल्या रुग्णांच्या घरातील पाण्याच्या नमुने घेतले अन त्याचं परीक्षण राज्य आरोग्य प्रयोगशाळेतून करुन घेतलं होतं. मात्र पुन्हा त्याच ठिकाणचे नमुने पाणी पुरवठा विभागाने घेतले. ज्यातून वैद्यकीय विभागाचा अहवाल चुकीचा असल्याचं अन सर्व ठिकाणचे पाणी पिण्यास योग्य असल्याचा दावा पाणी पुरवठा विभागाने केला. या दोन अहवालांमुळं पालिकेच्या वैद्यकीय आणि पाणी पुरवठा विभागातील समन्वयाचा अभाव दिसून आला. दुसरीकडे या दोन्ही अहवालांपैकी खरा कोणता मानायचा अन खोटा कोणता? असा मोठा संभ्रम शहरवासीयांमध्ये निर्माण झालाय. यानिमित्ताने पालिका आयुक्त शेखर सिंह यांचं या गंभीर बाबीकडे लक्ष नव्हतं का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालाय.