पुणे महापालिकेतील विकासनिधीच्या असमान वाटपावरून महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात राजकीय वाद पेटला आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी प्रभागातील नागरिकांचे प्रश्न मांडणे हे आपले प्राथमिक कर्तव्य असल्याचे सांगत युतीधर्माचे उल्लंघन केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. सर्व मांडणी अधिकृत कागदपत्रांवर आधारित असून कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता विकासाचा लढा सुरू ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.दुसरीकडे, भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी बालवडकर यांच्याकडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर होणाऱ्या सातत्यपूर्ण टीकेची गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवून माहिती दिली आहे. वैयक्तिक आकस आणि प्रसिद्धीसाठी केली जाणारी बिनबुडाची विधाने खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशारा देत घाटेंनी या पत्राचा विकासनिधीशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले. महापालिकेतील या राजकीय संघर्षामुळे पुण्यातील महायुतीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.