साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे दसरा. दसऱ्याच्या शुभ मूहूर्तावर घरात अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यासोबत सोनं चांदीच्या वस्तूंची खरेदी सुद्धा केली जाते. पण मागील काही दिवसांमध्ये सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे सोनं खरेदी करायला जाताना खूप जास्त विचार केला जात आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर कोणत्या नाजूक साजूक दागिन्यांची खरेदी तुम्ही करू शकता, याबद्दल सांगणार आहोत. हे दागिने रोजच्या वापरात सुद्धा अतिशय सुंदर दिसतील. (फोटो सौजन्य: Pinterest)
दसऱ्याच्या शुभ मूहूर्तावर करा 'या' कमी वजनाच्या आकर्षक दागिन्यांची खरेदी
सर्वच महिला हातांमध्ये सोनं किंवा चांदीचा अंगठी घालतात. त्यामुळे तुम्ही ३ ते ४ ग्रॅमची सोन्याची अंगठी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर खरेदी करू शकता. सणावाराच्या दिवसांमध्ये सोन्याच्या अंगठ्यांचे अनेक नवनवीन प्रकार बाजारात उपलब्ध असतात.
महाराष्ट्राचा पारंपरिक दागिना म्हणजे नथ. सणावाराच्या दिवसांमध्ये नथ आवर्जून घातली जाते. त्यामुळे या डिझाईनची सुंदर नथ तुम्ही विकत घेऊ शकता. मोत्याचे मणी आणि सोन्याच्या तारीमध्ये गुंफण करून बनवलेली नथ नाकात अतिशय सुंदर दिसते.
नाजूक साजूक दागिन्यांची खरेदी करताना तुम्ही सोन्याचा नेकलेस किंवा मण्यांची ठुशी सुद्धा विकत घेऊ शकता. ठुशी दागिना कोणत्याही साडीवर सूंदर दिसतो.
रोजच्या वापरात महिला कानात सोन्याचे कानातले घालतात. त्यामुळे सोन्याचे झुमके किंवा टॉप तुम्ही दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी करू शकता.
ल्गनांतर मुली पायात चांदीच्या जोडव्या घालतात. बाजारात जोडव्यांचे अनेक नवनवीन डिझाईन उपलब्ध झाल्या आहेत. अतिशय कमी किंमतीमध्ये तुम्ही चांदीच्या जोडव्या विकत घेऊ शकता.