कुडाळ तालुक्याच्या घोटगे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची पटसंख्या वाढविण्याच्या दृष्टिकोनातून सरपंच चैताली ढवळ आणि ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. गावातील जी मुले शिक्षणासाठी हायस्कूल आणि शहरात जातात, त्यांच्या पालकांनी आपली मुले गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये पाठविल्यास त्यांची आर्थिक वर्ष २०२५-२६ साठीची त्यांची घरपट्टी माफ करण्यात येईल, असा ठराव घोटगे ग्रामपंचायत मासिक सभेत घेण्यात आला. गावातील मराठी शाळा वाचविण्यासाठी असा महत्वपूर्ण निर्णय घेणारी घोटगे ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.