जवळपास ७० टक्के सोयाबीनचे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी ७० टक्क्यांपर्यंत उध्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे पुढचे वर्ष अत्यंत संकटात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने परिस्थितीचा आढावा घ्यावा, पंचनामे करावेत आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहण्याची आवश्यकता आहे.सरकारने ही जबाबदारी गांभीर्याने घेतली पाहिजे. सोयाबीनमधून शेतकऱ्यांच्या हातात काहीच येणार नाही, अशी परिस्थिती आहे. पुन्हा शेतकरी देशोधडीला लागेल आणि कर्जबाजारी होईल.शेतकरी दर मिनिटाला आत्महत्या करतो. त्यासंदर्भातील माहिती आम्ही गोळा केली आहे. शेतकऱ्यांना या संकटातून वाचवण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर काम करावे.