Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Paryushan Parva 2026: ऐकूनच आश्चर्य वाटेल! जैन धर्मात डोक्यावरील आणि दाढीचे केस हाताने उपटून काढण्याची परंपरा का?

Paryushan Parva 2026: आजपासून जैन धर्मातील महत्त्वाचा सण पर्युषण पर्व २०२६ सुरू होत आहे. माफी, तप, उपवास आणि साधनेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या पर्वात जैन मुनींच्या जीवनातील ‘केशलोचन’ या धार्मिक परंपरेचीही चर्चा होते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 08, 2026 | 03:03 PM
Paryushan Parva 2026: ऐकूनच आश्चर्य वाटेल! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Paryushan Parva 2026: ऐकूनच आश्चर्य वाटेल! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • पर्युषण पर्व २०२६ जैन धर्मातील तप, उपवास आणि आत्मचिंतनाचा महत्त्वाचा काळ.
  • केशलोचन म्हणजे जैन दीक्षा घेताना केसांचा त्याग करण्याची धार्मिक परंपरा.
  • केसांचा त्याग हा सौंदर्य आणि ऐहिक सुखांपासून अलिप्ततेचे प्रतीक मानला जातो.
Paryushan Parva Rituals: आजपासून जैन धर्माचा सगळ्यात मोठा सण पर्युषण पर्व 2026 सुरू होत आहे. हा सण माफी मागण्याचा, तप करण्याचा सण आहे. या दिवसांमध्ये जैन लोक उपवास आणि साधना करतात. पण या काळात जैन मुनींच्या आयुष्यातील एक गोष्टीची खूप चर्चा असते ती म्हणजे केशलोचन. तुम्ही कधी ऐकलं आहे का? जैन साधू स्वतःच्या डोक्याचे आणि दाढीचे केस स्वतःच्या हाताने उपटून काढतात. ऐकायला पण अंगावर काटा येतो. इतक्या वेदना सहन करून ते असं का करतात? आणि त्यासाठी ते कात्री किंवा ब्लेड का वापरत नाहीत? चला, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. Paryushan Parva 2026:

केशलोचन म्हणजे नक्की काय?

केशलोचन म्हणजे केस उपटणे. जेव्हा एखादी व्यक्ती संसार सोडून जैन मुनी किंवा साध्वी बनते, तेव्हा त्याला दीक्षा दिली जाते. त्याचवेळी हा विधी केला जातो. मुनी आपल्या हातांनी डोक्यावरचे आणि चेहऱ्यावरचे केस मुळापासून उपटतात.हा फक्त केस काढण्याचा प्रकार नसून खूप मोठा विचार आहे. केस म्हणजे सुंदर दिसण्याचं साधन. केसांमुळे माणूस सुंदर दिसतो. ते काढून टाकणं म्हणजे आपण आता शरीराच्या सौंदर्याला, ऐहिक सुखाला सोडून दिलं आहे.

ब्लेड किंवा कात्री का नाही वापरत?

तुम्हाला प्रश्न पडेल की,हाताने उपटण्यापेक्षा कात्रीने किंवा ब्लेडने केस कापले तर वेदना होणार नाहीत. पण जैन धर्मात असं केलं जात नाही.याची दोन कारणं आहेत.

  • पहिलं कारण म्हणजे अहिंसा जैन धर्मात कोणत्याही जीवाला दुखवायचं नाही असं सांगितलं आहे. कात्री, ब्लेड यांसारख्या वस्तूंमुळे त्वचेवर असणाऱ्या बारीक जीवांना इजा होऊ शकते असं मानलं जातं.
  • दुसरं कारण म्हणजे त्याग ब्लेड-कात्री वापरणं म्हणजे सोपा मार्ग निवडणं. पण जैन मुनींना सोपा मार्ग नको असतो. त्यांना वेदना सहन करून आपल्या मनावर ताबा मिळवायचा असतो.केस कापले तर पुन्हा सौंदर्याची इच्छा मनात राहते. पण मुळापासून उपटले की ती इच्छाच संपून जाते.

इतक्या वेदना सहन का करतात?

खरंच हा विधी खूप वेदनादायी आहे. मुळापासून केस उपटताना खूप दुखतं. पण जैन मुनी ते हसत हसत सहन करतात. का?कारण त्यांच्यासाठी हा एक तप आहे. सुख आणि दुःखाच्या पलीकडे जाण्याचा हा मार्ग आहे. शरीराला कितीही त्रास झाला तरी मन शांत कसं ठेवायचं, याची ही परीक्षा आहे. जेव्हा माणूस वेदना सहन करायला शिकतो, तेव्हा त्याला राग, लोभ, मोह यावर पण नियंत्रण ठेवता येतं. हाच या विधीचा खरा उद्देश आहे.

Ganesh Chaturthi 2026: पहिल्यांदाच घरच्या घरी गणपती बसवणार? बाप्पांची कृपा हवी असेल तर ‘या’ 7 गोष्टी लक्षात ठेवा

दीक्षेच्यावेळी याचं काय महत्त्व आहे?

जेव्हा एखादा माणूस साधू बनतो, तेव्हा तो शपथ घेतो की मी आता संसाराशी संबंध तोडत आहे. माझं जुनं आयुष्य संपलं. केशलोचन करून तो हेच दाखवतो. मी माझ्या रूपाचा, शरीराचा मोह सोडला आहे. आता बाहेरच्या सुंदरतेपेक्षा आतल्या आत्म्याची शुद्धता माझ्यासाठी महत्त्वाची आहे.हा विधी कसा केला जातो?हा विधी एका धार्मिक वातावरणात केला जातो. मुनी एका जागी बसतात. आजूबाजूला मंत्र म्हटले जातात. मग ते स्वतःच्या हाताने हळूहळू केस उपटतात. कधी कधी मोठे गुरु पण त्यांना मदत करतात.

Horoscope Today, September 8: बाप्पांच्या कृपेने नशीब पालटणार? आजचा मंगळवार ‘या’ राशींसाठी घेऊन येणार मोठी खुशखबर!

सगळा विधी झाल्यावर ते पुढच्या साधनेला लागतात.किती वेळा करतात?हा विधी एकदाच नाही केला जात. जैन परंपरेनुसार मुनी वर्षातून एक किंवा दोन वेळा केशलोचन करतात. बघायला गेलं तर हे खूप कठीण वाटतं, पण त्यांच्यासाठी हा त्यांच्या साधनेचा, त्यागाचा एक भाग आहे.म्हणूनच पर्युषण पर्वात या विधीला खूप महत्त्व आहे. हे आपल्याला शिकवतं की खरं सुख बाहेरच्या गोष्टीत नाही तर त्यागात आणि संयमात आहे.

Web Title: What is keshlochan understanding the jain tradition of renouncing hair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • Jain
  • Marathi News
  • religion news

संबंधित बातम्या

Petrol vs CNG vs Hybrid vs EV?: कार खरेदीपूर्वी हे नक्की वाचा! पेट्रोलपासून EVपर्यंत कोणता पर्याय तुमचे पैसे वाचवेल?
1

Petrol vs CNG vs Hybrid vs EV?: कार खरेदीपूर्वी हे नक्की वाचा! पेट्रोलपासून EVपर्यंत कोणता पर्याय तुमचे पैसे वाचवेल?

Satara News : भीम-कुंती उत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न; अश्वारूढ रथातून कुंती मातेची भव्य मिरवणूक
2

Satara News : भीम-कुंती उत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न; अश्वारूढ रथातून कुंती मातेची भव्य मिरवणूक

Sangli : जात प्रमाणपत्र देता की जाता? कोळी समाजाची आक्रमक भूमिका
3

Sangli : जात प्रमाणपत्र देता की जाता? कोळी समाजाची आक्रमक भूमिका

Anshuman Vichare New House: अंशुमन विचारेचं स्वप्नातील घर पाहिलंत का? VIDEO शेअर करत पहिल्यांदाच दाखवली सुंदर झलक
4

Anshuman Vichare New House: अंशुमन विचारेचं स्वप्नातील घर पाहिलंत का? VIDEO शेअर करत पहिल्यांदाच दाखवली सुंदर झलक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.