Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News : रेल्वे रूळ ओलांडण्याची बेफिकिरी वाढली; सात महिन्यांत ८,४११ प्रकरणांची विक्रमी नोंद

मुंबईत रेल्वे रूळ ओलांडण्याच्या घटनांमध्ये जुलै महिन्यात मोठी वाढ झाली आहे. जानेवारी ते जूनच्या तुलनेत जुलैमध्येच विक्रमी ४,५५० प्रकरणे नोंदवली गेली असून, प्रवाशांचा जीवघेणा शॉर्टकट चिंतेचा विषय ठरत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 08, 2026 | 03:05 PM
Mumbai News : रेल्वे रूळ ओलांडण्याची बेफिकिरी वाढली; सात महिन्यांत ८,४११ प्रकरणांची विक्रमी नोंद

Mumbai News : रेल्वे रूळ ओलांडण्याची बेफिकिरी वाढली; सात महिन्यांत ८,४११ प्रकरणांची विक्रमी नोंद

Follow Us
Follow Us:
  • जुलैमध्ये रूळ ओलांडण्याची विक्रमी ४,५५० प्रकरणे
  • सात महिन्यांत ८,४११ प्रकरणांची नोंद
  • रूळ ओलांडल्याने लोकल वाहतुकीवरही परिणाम
पादचारी पूल किंवा भुयारी मार्गाचा वापर करून काही मिनिटे अधिक चालण्यापेक्षा थेट रूळ ओलांडण्याचा शॉर्टकट घेण्याची प्रवाशांची घाई जीवघेणी ठरत आहे. मुंबई विभागात रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) केलेल्या कारवाईत जानेवारी ते जुलै २०२६ या सात महिन्यांत एकूण ८,४११ रूळ ओलांडण्याची प्रकरणे नोंदविण्यात आली. धक्कादायक म्हणजे यापैकी ४,५५० प्रकरणे एकट्या जुलै महिन्यातील आहेत. ही संख्या जानेवारी ते जून या सहा महिन्यांतील ३,८६१ प्रकरणांपेक्षा तब्बल ६८९ ने अधिक आहे.

Mumbai Crime: मिरा रोडवर पुन्हा धारदार शस्त्राचा थरार; पाठलाग करून तरुणाला पकडलं अन्…

रूळ ओलांडण्याची बेफिकिरी संबंधित व्यक्तीचा जीव धोक्यात घालण्याबरोबरच लोकल वाहतुकीलाही फटका देते. अपघात झाल्यास संबंधित ठिकाणी लोकल थांबवावी लागते. त्यामुळे मागील गाड्यांच्या फेऱ्यांवर परिणाम होऊन हजारो प्रवाशांना विलंब सहन करावा लागतो. एका व्यक्तीच्या काही मिनिटांच्या घाईची किंमत हजारो प्रवाशांना वेळेच्या रूपाने मोजावी लागते. रेल्वे रूळ ओलांडल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याची प्रकरणे दाखल आहेत.

शॉर्टकटचा अट्टहास ठरतोय जीवघेणा

पादचारी पूल, भुयारी मार्ग किंवा अधिकृत मार्ग उपलब्ध असतानाही काही प्रवासी बेट रुळांवर उतरतात. धावती लोकल काही सेकंदांवर असतानाही रूळ ओलाडण्याचा प्रयत्न केला जातो. हा निष्काळजीपणा क्षणात जीवघेणा ठरू शकतो. अपघात झाल्यास त्याची झळ संबंधित व्यक्तीपुरती मर्यादित राहत नाही, तर लोकल सेवा विस्कळित होऊन हजारो प्रवाशांना त्याचा फटका बसतो.

दंडाची भीतीही नाही

सात महिन्यांत ५,५३५ प्रकरणात दंडात्मक तर २,८७६ प्रकरणांत न्यायालयीन कारवाई करण्यात आली. या कारवाईतून एकूण ३८ लाख ८० हजार ६९७ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जुलैमध्ये ४,५५० प्रकरणांपैकी तब्बल ४,५४९ प्रकरणांत दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर केवळ एका प्रकरणात न्यायालयीन कारवाई झाली. बेजबाबदार प्रवृतीला रोखू शकलेली नाही, है आकडेवारीवरून स्पष्ट होते.

Mumbai News: शतकाअखेर मुंबई जलमय होण्याचा धोका! BMC करणार किनारपट्टीचे सविस्तर नकाशांकन

जुलैमध्ये अचानक उसळी

जानेवारीत ४३८, फेब्रुवारीत ७९६, मार्चमध्ये ५६३. एप्रिलमध्ये ३१२ आणि मेमध्ये ३४५ प्रकरणे नोदली गेली. जूनमध्ये हा आकडा १,४०७ वर पोहोचला, मात्र जुलैमध्ये रूळ ओलांडण्याच्या प्रकरणांनी अचानक उसळी घेत थेट ४,५५० चा टप्पा गाठला. सात महिन्यातील एकूण प्रकरणांपैकी तब्बल ५४ टक्के प्रकरणे एकट्या जुलैमध्ये नोंदली गेली.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Mumbai railway track crossing july 2026 record 4550 cases rpf action passenger safety local train disruption

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • Mumbai News
  • Mumbai Railway
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Dhiraj Deshmukh Latur : “शासनाची भूमिका दुटप्पी अन् शेतकरीविरोधी!” धीरज देशमुखांचा आक्रमक पवित्रा!
1

Dhiraj Deshmukh Latur : “शासनाची भूमिका दुटप्पी अन् शेतकरीविरोधी!” धीरज देशमुखांचा आक्रमक पवित्रा!

Chandrapur News: ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी चिमूरमध्ये मोठी घडामोड! सरपंचपदाचे आरक्षण जाहीर, कुणाला धक्का तर कुणाला संधी?
2

Chandrapur News: ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी चिमूरमध्ये मोठी घडामोड! सरपंचपदाचे आरक्षण जाहीर, कुणाला धक्का तर कुणाला संधी?

Nagpur News: महायुती सरकारने जरांगे पाटलांच्या समोर गुडघे टेकले – विजय वडेट्टीवार
3

Nagpur News: महायुती सरकारने जरांगे पाटलांच्या समोर गुडघे टेकले – विजय वडेट्टीवार

Raigad News: स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांवर आर्थिक बोजा? शेकापचा सरकार-महावितरणवर हल्लाबोल, ऑक्टोबरमध्ये आंदोलनाचा इशारा
4

Raigad News: स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांवर आर्थिक बोजा? शेकापचा सरकार-महावितरणवर हल्लाबोल, ऑक्टोबरमध्ये आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.