अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील प्रसिद्ध अप्पर वर्धा धरणाचा पाणीसाठा अद्याप समाधानकारक पातळीवर पोहोचलेला नाही. ऑगस्ट महिना संपला असतानाही धरणात पाणीसाठा कमी असल्याची माहिती आहे. धरणाची निर्धारित जलाशय पातळी 342 मीटर असून, मोर्शी, वरूडसह अमरावती आणि परिसरातील अनेक गावांना याच धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, मोर्शी तालुका, धरण परिसर आणि मध्य प्रदेशातील जलप्रवाह क्षेत्रात अपेक्षित दमदार पाऊस न झाल्याने धरणात पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. अप्पर वर्धा धरणाला एकूण 13 दरवाजे असून, अद्याप एकही दरवाजा उघडण्यात आलेला नाही. दरवर्षी पावसाळ्यात धरण भरल्यानंतर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. मात्र यंदा धरणातील पाण्याची पातळी कमी असल्याने पर्यटनावरही परिणाम झाला असून पर्यटकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. दरम्यान, परिसरात आतापर्यंत सुमारे 209 मिलीमीटर पाऊस झाल्याचे सांगण्यात येत असून, आगामी काळात दमदार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये तरी अप्पर वर्धा धरण भरेल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.