
चिमुकल्याचे मोठे मन! नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिमुरड्याने आपली 'गुल्लक' केली जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाली; Video Viral
मागील काही काळापासून नेपाळमधील भीषण पूराचे अनेक व्हिडिओज समोर आले आहेत. यामुळे देशाचे आर्थिक नुकसान झाले असून तेथील नागरिकांपर्यंत आपली मदत पोहचवण्यासाठी किंवा मदतीत आपला हातभार लावण्यासाठी अरबाज आपला गुल्लक घेऊन जिल्ह्याधिकाऱ्यांची ऑफिसमध्ये पोहचला. खाऊसाठी साठवलेले पैसे लोकांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय त्याने घेतला, जी त्याच्या मनातील उदारता दाखवून देते. गुल्लकमध्ये जरी लाखो रुपये नसले तरी त्यात चिमुकल्याच्या मनाची श्रीमंती भरलेली होती. ही घटना सध्या चांगलीच चर्चेत असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
नक्की काय घडलं?
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत आपण पाहू शकता यात ६ वर्षीय अरबाज पूर्ण आत्मविश्वासाने एक लिखित प्रार्थना पत्र आणि गुल्लकमध्ये जमा केलेले आपले पैसे कुशीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाधिन करताना दिसतो. लहान मुलाच्या या कृतीने फक्त यूजर्सनाच नाही तर जिल्हाधिकारांनाही थक्क करुन सोडलं. लहान गुल्लकमधील त्याचा विचार जेव्हा त्यांना समजला तेव्हा हे दृष्य त्यांनी कॅमेरात कैद करुन घेण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी मुलासोबत फोटो काढला आणि त्याच्या या मदतीसाठी त्याचे काैतुक आणि आभार मानले. अधिकाऱ्यांनी मुलाला आश्वासन दिले की त्याची ही मदत नक्कीच नेपाळच्या लोकांपर्यंत पोहचवली जाईल.
देशासाठी जिंकली ४ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके, आज पोट भरण्यासाठी रस्त्यावर विकतोय भाजी; Video Viral
हा व्हिडिओ @sarcastic_doctorrr नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत असून यूजर्सने चिमुकल्याच्या कृतीवर अनेकांनी आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “मला वाटतं यांची ही फक्त नाटकं चालू आहेत”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खूप छान छोट्या, तुझे वय लहान आहे पण मन मोठे आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “त्याच्या आई-वडिलांना त्याच्यावर चांगले संस्कार केले आहेत”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.