Viral Video: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Viral Video: आजकाल सोशल मीडिया म्हणजे काय, तर जगात कुठे काय चाललंय ते एका क्लिकवर कळतं. फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युबवर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होतात. कोणी डान्स करतं, कोणी गाणं म्हणतं, तर कोणी प्राण्यांचे भारी व्हिडिओ टाकतं. लहान पोरांपासून ते म्हाताऱ्या आजी-आजोबांपर्यंत सगळेच आता सोशल मीडियावर फेमस होत आहेत. वयाचा इथे काहीच संबंध नाही, तुमच्यात टॅलेंट असेल तर लोक तुम्हाला डोक्यावर घेतात. Viral Video:
नवरात्र तर आता संपून गेली, पण गरबा आणि दांडियाची हवा अजूनही सोशल मीडियावर आहे. नऊ दिवस लोकांनी मनसोक्त गरबा खेळला, छान छान कपडे घातले आणि त्याचे व्हिडिओ टाकले. तेच व्हिडिओ आता सगळीकडे व्हायरल होत आहेत. लहान मुलं, कॉलेजची पोरं आणि अगदी 70-80 वर्षांचे आजी-आजोबा पण गरब्यात नाचताना दिसत आहेत. याच गर्दीत एका आजीचा व्हिडिओ सध्या इंटरनेट गाजवतोय.
इंस्टाग्रामवर @anmolraj339 या अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये एक आजी हातात दांडिया घेऊन नाचत आहे. पण नाच कसा? एकदम जोशात, चेहऱ्यावर मोठं हसू आणि एनर्जी तर अशी की बाजूला उभ्या असलेल्या तरुण मुली पण फेल होतील.वयाचा विचार न करता आजी ज्या पद्धतीने तालावर थिरकत आहेत, दांडियाची काठी फिरवत आहेत ते पाहून खरंच भारी वाटतं. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला की वाटतं, जगण्याची उमेद अशी असावी. थकवा, गुडघेदुखी काहीच नाही, फक्त आनंद आणि उत्साह.
हा व्हिडिओ लोकांना इतका आवडला आहे की त्याला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. कमेंट सेक्शन पण भरून गेलंय.
View this post on Instagram
लोकांनी आजीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.एकाने लिहिलंय, “आजी आता खूप फेमस होणार, एकदम भारी!”दुसरा म्हणतोय, “किती गोड नाचल्या आजी, वयाला हरवलं त्यांनी.”तर अजून एक युजर लिहितो, “एकच नंबर गरबा आजी, तुम्हाला मानलं.”खरंच आहे, व्हायरल होण्यासाठी वय लागत नाही. तुमचा आत्मविश्वास, तुमचा आनंद हाच लोकांना आवडतो. या आजीने तेच दाखवून दिलंय.
पापाच्या परीने दसऱ्याला फोडला दिवाळीचा राॅकेट, खेळ फसला अन् अंगावर येऊन आदळला फटाका; Video Viral
सोशल मीडिया आता फक्त टाईमपास राहिला नाही, तर ते एक असं ठिकाण झालंय जिथे प्रत्येकाला आपली कला दाखवता येते. आजीच्या या व्हिडिओने हेच सिद्ध केलंय की मनात असेल तर वयाचं बंधन येत नाही. आजीच्या हा व्हिडिओ पाहून नक्कीच चेहऱ्यावर हसू फूटेल.
Ans: एका आजीचा उत्साहाने दांडिया डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Ans: हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.
Ans: @anmolraj339 या अकाउंटवरून व्हिडिओ शेअर झाला आहे.






