(फोटो सौजन्य: Instagram)
आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) चे नवनवीन चमत्कार पाहून यूजर्स नेहमीच भारावून जातात. याद्वारे अशा काल्पनिक घटनांचे व्हिडिओज तयार केले जातात, ज्यातील दृश्ये आपल्या कल्पनेपलिकडचे ठरतील. फेसबुक, इंस्टाग्रामप्रमाणेच आता AI देखील आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. त्यात अलिकडेच, AI चा एक अनोखा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात AI ने बजरंगबलीला पॅरॅलल दुनियेत लंकेली जाळताना यात दाखवण्यात आले आहे. सोशल मिडियावरील अनेक यूजर्स हा व्हिडिओ पाहून आता भारावून गेले आहेत आणि याला वेगाने शेअर देखील करत आहेत. चला तर मग यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
असा मृत्यू नकोच रे बाबा! ट्रॅकवर अडकलेली बाईक उचलायला गेला, मागून Railway आली अन्…; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर होत असलेल्या या व्हायरल या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका मुलाने लंकेत प्रवेश केला आहे आणि तो राक्षसांमध्ये हनुमान उभा असल्याचे दाखवत आहे. व्हिडिओमध्ये मुलगा खरंतर एआय व्हिडिओ तयार करत असतो ज्यात तो सैनिकांना हनुमानाच्या शेपटीला आग लावताना दाखवतो. त्यानंतर तो माणूस हनुमानाला लंका जाळताना दाखवतो. या व्हिडिओमध्ये लंका भयंकर जळताना दिसते जे पाहून यूजर्स आश्चर्य व्यक्त करत आहेत. व्हिडिओतील सर्वच दृश्ये इतकी अद्भूत आणि खरी वाटतात की पाहून ती खरी आहेत असेच वाटते.
पतीसाठी मागितलं दीर्घायुष्य, पण स्वतःचच आयुष्य संपलं; डान्स करताना हृदयविकाराचा झटका, Video Viral
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @oyemox नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आदिपुरुष चित्रपटाहून छान आहे हे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जय श्री राम” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अरे भावा तू वाचला कसा काय?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.