Ravan Dahan Viral Video: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Ravan Dahan Viral Video: दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाची परंपरा आपल्याकडे वर्षानुवर्षे चालत आली आहे. सत्याने असत्यावर विजय मिळवला या विचाराने सगळीकडे मोठमोठे रावणाचे पुतळे उभे केले जातात. त्या पुतळ्यांमध्ये गवत, काडी-कचरा आणि भरपूर फटाके भरलेले असतात. मग गावातली किंवा शहरातली एखादी मोठी व्यक्ती श्रीराम बनून बाण मारून त्या रावणाला आग लावते. हे पाहण्यासाठी हजारो लोक गर्दी करतात.
पण यंदा दसऱ्याला असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि तो पाहून लोकांना हसावं की काय करावं हेच कळत नाहीये.
सोशल मीडियावर रावण दहनाचे भरपूर व्हिडिओ येत आहेत. पण एका व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष खेचून घेतलं. झालं असं की, एका ठिकाणी रावणाच्या पुतळ्याला आग लावली. आग लागताच पुतळ्याच्या आत भरलेले फटाके फुटायला लागले. पण हे फटाके वर आकाशात जाण्याऐवजी थेट समोर उभ्या असलेल्या लोकांच्या दिशेने यायला लागले.रॉकेटसारखे फटाके, ठिणग्या सगळ्या थेट पब्लिकवर.
हे पाहताच लोकांची एकच धावपळ उडाली. सगळे जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. कोण इकडे पळतंय, कोण तिकडे पळतंय, काहीच कळेना. खरं तर हा प्रकार खूप धोकादायक आहे. अशाने लोकांना इजा पण होऊ शकते. पण व्हिडिओमध्ये लोक ज्या पद्धतीने पळत आहेत ते पाहून हसू पण आवरत नाही.
पापाच्या परीने दसऱ्याला फोडला दिवाळीचा राॅकेट, खेळ फसला अन् अंगावर येऊन आदळला फटाका; Video Viral
हा व्हिडिओ @Gabbar0099 नावाच्या X अकाउंटवर टाकण्यात आला आहे. व्हिडिओत स्पष्ट दिसतंय, एक माणूस रावणाला आग लावतो. सुरुवातीला सगळं व्यवस्थित वाटतं. पण दोन सेकंदातच आतले फटाके फुटायला लागतात आणि सगळा खेळ बिघडतो.
फटाक्याच्या ठिणग्या लोकांच्या अंगावर उडायला लागल्यावर लोक घाबरले. बायका, मुलं, म्हातारी माणसं सगळेच पळायला लागले. ज्या उत्सवातून सत्याचा विजय झाला हा संदेश जायला हवा होता, तिथे काही वेळासाठी भीतीचं वातावरण तयार झालं. रावण तर जळत होताच, पण त्याच्यासोबत लोकांची पण पळापळ सुरू होती. सुदैवाने यात कोणी गंभीर जखमी झाल्याची बातमी नाही, पण असा हलगर्जीपणा जीवावर बेतू शकतो.
View this post on Instagram
हा व्हिडिओ आतापर्यंत 4 लाख 22 हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. लोक यावर भन्नाट कमेंट करत आहेत.
एका युजरने लिहिलंय @pythonym – “ज्यांनी रावण जाळला ते रावणापेक्षाही जास्त भ्रष्ट दिसत आहेत.”
दुसरा युजर @Kakashi10009 म्हणतोय – “रावण मनात म्हणत असेल, नाभीत बाण मारायचा होता, आता बघतोच तुमच्याकडे!”
तर @avadhesh1569 या युजरला शंका आली आहे. तो म्हणतोय, “हे मुद्दाम केलेलं वाटतंय. बघा, रावण पूर्ण पेटायच्या आधीच लोकं पळायला लागली होती.”
‘मी रावण आहे, रस्त्यावरचा चोर नाही!’ चप्पल पडताच संतापला लंकेश; पाहा Viral Video
खरंच, दरवर्षी रावण दहन करताना अशी काळजी घेतली पाहिजे. पुतळ्यात फटाके भरताना ते व्यवस्थित लावले पाहिजेत, जेणेकरून ते लोकांच्या दिशेने येणार नाहीत. सुरक्षेचं पण भान ठेवलं पाहिजे. उत्सव हा आनंदासाठी असतो, तो असा गोंधळात बदलता कामा नये. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला का? तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट करून नक्की सांगा.
Ans: रावणाच्या पुतळ्याला आग लावल्यानंतर फटाके लोकांच्या दिशेने उडू लागले आणि उपस्थितांची धावपळ झाली.
Ans: हा व्हिडिओ @Gabbar0099 या X अकाउंटवर शेअर करण्यात आला.
Ans: दिलेल्या बातमीनुसार, या घटनेत कोणी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.






