Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोत्यात भरली पोरं अन् १० वर्षांच्या योजनेनंतर अखेर कुटुंबाने नार्थ कोरीयातून केले पलायान; स्वातंत्र्याची थरारक कहाणी

North Korea Family Escape : कठोर निर्बंध आणि हुकुमशाहीच्या जाचातून एका कुटुंबाने आपली सुटका केली आणि त्यांच्या स्वातंत्र्याची कहाणी सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरली. उत्तर कोरियातून पलायन केलेलं हे कुटुंब कोण? जाणून घ्या संप

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 22, 2026 | 12:26 PM
पोत्यात भरली पोरं अन् १० वर्षांच्या योजनेनंतर अखेर कुटुंबाने नार्थ कोरीयातून केले पलायान; स्वातंत्र्याची थरारक कहाणी

पोत्यात भरली पोरं अन् १० वर्षांच्या योजनेनंतर अखेर कुटुंबाने नार्थ कोरीयातून केले पलायान; स्वातंत्र्याची थरारक कहाणी

Follow Us
Follow Us:
  • कठोर निर्बंध असलेल्या देशातून बाहेर पडण्यासाठी कुटुंबाने धोकादायक निर्णय घेतला.
  • अनेक वर्षांच्या तयारीनंतर योग्य वेळ साधत त्यांनी आपली योजना अंमलात आणली.
  • प्रवासादरम्यान प्रत्येक पावलावर जीवाला धोका असूनही त्यांनी हार मानली नाही.
उत्तर कोरिया हा पूर्व आशियातील एक असा देश आहे जो आपल्या सरकारच्या हुकुमशाहीसाठी ओळखला जातो. इथे नागरिकांना कठोर निर्बंधात ठेवलं जातं. इथे नागरिकांच्या प्रत्येक लहान-सहान गोष्टींवर निर्बंध लावण्यात आले आहेत. जसे की, कपडे कसे घालावेत, हेअर स्टाईल कशी करावी. इथला नागरिक परवानगीशिवाय देश देखील सोडून जाऊ शकत नाही. माहितीनुसार, इथे एकेकाळी नागरिकांच्या हसण्यावर देखील बंदी घालण्यात आली होती. आता अशा देशात वास्तव करणे म्हणजे कोणत्या आव्हानाहून कमी नाही. विचार करा जिथे तुमच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवली जात असेल, तुमच्या प्रत्येक निर्णयासाठी जर कठोर कायदे असतील तर त्या देशात राहणं आपल्यासाठी कठीण होऊन बसतं. पण अशा देशातून स्वत:ची सुटका करण्याचा विचार देखील आपल्यासाठी धोकादायक ठरु शकतो. अशातच आज आम्ही तुम्हाला या हुकुमशाही देशातील एका कुटुंबाची कथा सांगत आहेत ज्यांनी अथक प्रयत्नांनंतर या बंदिस्त वातावरणातून आपली सुटका करुन घेतली. हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता आणि त्यांनी हे नक्की कसं सार्थकी आणलं ते आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

हा माझाच नातेवाईक का? डमी हत्तीला पाहून खऱ्या हत्तीचं कन्फ्युजन, पुढे काय केलं ते पाहून हसू आवरणार नाही; हास्यास्पद Video Viral

हुकुमशाहीतून स्वत:ची सुटका करुन घेणं प्रत्येकाला जमण्यासारखी गोष्ट नाही. पण किम इल-ह्योक आणि किम यी-ह्योक या दोन भावांनी गुलामगिरीच्या या बेड्या तोडण्याचा दृढनिश्चय केला होता. १० वर्षांपूर्वी आपल्या वडिलांनी पाहिलेले स्वातंत्र्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, त्या भावांनी आपला जीव धोक्यात घातला. पलायनासाठी निवडलेला दिवस होता ६ मे २०२३, जेव्हा समुद्रातील वादळामुळे रक्षकांची दृष्टी अंधुक झाली होती.

माध्यमांच्या वृत्तानुसार , हा प्रवास इतका धोकादायक होता की, ४ आणि ६ वर्षांच्या मुलांना पोत्यांमध्ये कोंबण्यात आलं होतं, जेणेकरून त्यांचा किंचितसा रडण्याचा आवाज पथकापर्यंत पोहोचू नये. इतकेच नव्हे तर, घरातील महिलांना भूसुरुंगांनी भरलेल्या भागातून जावे लागले. त्यांची एक छोटीशी चूक त्यांची कुटुंबाला नष्ट करु शकली असती. किमची पत्नी त्यावेळी पाच महिन्यांची गर्भवती होती. सुरुवातीला हा धोका पत्कारण्यासाठी ती तयार नव्हती पण आपल्या न जन्मलेल्या बाळाला एक उज्वल भविष्य देण्यासाठी तिने हा धोका स्वीकारला.

त्यांनी जलमार्गाने देश सोडण्याचा निर्णय घेतला होता. ज्यासाठी दोन्ही भावांनी मच्छीमार असल्याचे भासवत तटरक्षक दलाचा विश्वास संपादित केला. ते अनेकदा आपली बोट सीमेजवळ नेऊन ती परत मागे आणत असत जेणेकरुन रक्षकांनी त्यांच्या उपस्थितीची सवय व्हावी. त्या वादळी रात्री त्यांनी रक्षकांना लाच दिली आणि अंधाराचा फायदा घेत आपली बोट थेट दक्षिण कोरियाच्या दिशेने वळवली. त्यांच्यासोबत त्यांच्या वडिलांची राखही होती, जी त्यांना त्या बंदिस्त देशात सोडून जायची नव्हती.

याला म्हणतात इंस्टंट कर्मा! कुत्र्यासोबत मस्ती करायला गेला पण शेवटी त्याच्यासोबतच कांड झाला… मजेदार Video Viral

जेव्हा त्यांनी सीमा ओलांडून दक्षिण कोरियाच्या सागरी हद्दीत प्रवेश केला तेव्हा तिथल्या चमचमत्या दिव्यांनी त्यांचे डोळे उजळवून काढले. त्यांना समजलं की त्यांनी अंधारातून प्रकाशात प्रवेश घेतला आहे. दुर्दैवाने ज्या भावाने १० वर्षे या योजनेची आखणी केली त्याला हे स्वांतत्र्य फार काळ पाहता आले नाही. स्वातंत्र्यानंतर अवघ्या १९ महिन्यांतच, डायव्हिंगच्या अपघातात लहान भावाचा मृत्यू झाला.

 

 

Web Title: After a 10 years plan the family finally escapes from north korea a thrilling tale of freedom

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 12:26 PM

Topics:  

  • North Korea
  • special story
  • viral news

संबंधित बातम्या

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
1

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!
2

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!
3

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल
4

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.