Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिलने केला घात! स्काॅरपिओची थारला जोरदार धडक, काही क्षणांतच आनंदाचे वातावरण शोकात बदलले, एकाचा मृत्यू; चित्तथरारक Video Viral

Thar and Scorpio Collide : अपघाताचा थरार! थार आणि स्काॅरपिओ एकमेकांना धडकले ज्यात स्काॅरपिओ ७-८ वेळा हवेत उलटली. चालकाचा जागीच मृत्यू झाला असून इतर लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अपघाताआधी गाडीत रिल शूट केली जात होती.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 03, 2026 | 09:32 AM
रिलने केला घात! स्काॅरपिओची थारला जोरदार धडक, काही क्षणांतच आनंदाचे वातावरण दु:खात बदलले, एकाचा मृत्यू; चित्तथरारक Video Viral

रिलने केला घात! स्काॅरपिओची थारला जोरदार धडक, काही क्षणांतच आनंदाचे वातावरण दु:खात बदलले, एकाचा मृत्यू; चित्तथरारक Video Viral

Follow Us
Follow Us:
  • रात्रीच्या प्रवासादरम्यान काही तरुणांचा आनंदाचा क्षण काही सेकंदांतच भीषण प्रसंगात बदलला.
  • व्हायरल व्हिडिओमध्ये अचानक घडलेल्या घटनेमुळे वाहनातील सर्वजण हादरल्याचे दिसून येते.
  • या घटनेनंतर रस्ते सुरक्षा, वेगमर्यादा आणि वाहन चालवताना सतर्क राहण्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
आजकाल लोक रिल बनवण्याच्या नादात इतके व्यस्त झाले आहेत की त्यांना स्वत:च्या जीवाची पर्वा राहिली नाही. सोशल मिडियावर अनेक धोकादायक स्टंट्स पाहायला मिळतात ज्यात लोक काही व्यूजसाठी स्वत:चा जीव पणाला लावताना दिसून येतात. अलिकडे अशीच एक थरारक घटना इंटरनेटवर व्हायरल झाली आहे. व्हिडिओमध्ये आपल्याला अपघाताचे काही चित्तथरारक दृष्य दिसून येईल. ही घटना इतकी भीषण होती की यात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. चला काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

एक चूक अन् अनर्थ घडला! धावत्या ट्रेनमध्ये चढताना तोल गेला आणि रुळाखाली चिरडली गेली आई-लेकाची जोडी; घटनेचा चित्तथरारक Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ हरियाणातील अंबाला येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी ग्रामीण रस्त्यांवरुन काही युवक आपल्या थार गाडीत बसून गंतव्यस्थानापर्यंत जात होते. गाडीच्या आत तरुणांची मजामस्ती सुरु होती, ते व्हिडिओ शूट करत होते आणि तितक्यातच अचानक समोरुन एक स्काॅरपिओ येऊन त्यांच्या गाडीला येऊन जोरदार धडक देते. ही धडक इतकी जबरदस्त असते की यामुळे गाडीची फ्रंट काच फुटते, सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण होते आणि इथेच व्हिडिओचा शेवट होतो.

38 सेकंदाच्या या व्हिडिओत सदर घटनेमुळे आनंदात सुरु असलेला प्रवास अचानक दु:खात बदलल्याचे दिसते. माहितीनुसार, या भीषण अपघातात स्काॅरपिओ चालकाचा मृत्यू झाला आहे तर थार गाडीतील सर्व तरुण गंभीर जखमी झाले आहेत. शेअर केला गेलेला हा व्हिडिओ गाडीच्या आतले दृष्य दाखवतो ज्यात आपल्याला मजामस्ती करता करताच अचानक कसा अपघात घडला ते पाहता येते.

ही घटना आपल्या सर्वांसाठी इशारा आहे की, गाडी चालवतना कधीही आपले लक्ष हे इतर कुठेही न ठेवून समोरच्या रस्त्यावर जास्त असावे. काळोख्या अंधारात स्ट्रीट लाईन नसताना तरुण रिल बनवत गाडीत प्रवास करत होते. परिणामी समोरुन वेगाने आलेली स्काॅरपिओ त्यांना दिसली नाही ज्यामुळे अपघात घडून आला. गाडी चालवताना कधीही रस्ते नियमांचे पालन करायला हवे अन्यथा आपला जीव कधी आपल्यापासून हिरवला जाईल याची शाश्वती देता येत नाही.

Ambala, Haryana: Thar and Scorpio collide head-on on unlit village link road; Scorpio overturns 7–8 times, driver died, others survive with critical injuries pic.twitter.com/ApGVHdR4rC — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 2, 2026

झाडावरून झाला पैशांचा पाऊस! वकिलाची बॅग चोरत माकडाने हवेत उधळले 2 लाख रुपये, लोकांची झुंबड अन् दृष्यांनी वेधले लक्ष; Video Viral

अपघाताचे हे दृष्य @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘विना गाव लिंक रोडवर थार आणि स्कॉर्पिओची समोरासमोर धडक; स्कॉर्पिओ 7-8 वेळा उलटली, ड्रायव्हर मरण पावला, इतर गंभीर जखमी होऊन वाचले’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “त्या दोघांचेही हाय-बीम चालू होते. वन-वे रस्त्यावर हाय-बीम चालू ठेवणाऱ्या या हरामी लोकांचा मला नेहमीच प्रचंड राग येतो.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “असं दिसतंय की चालकाने सीटबेल्ट लावला नाहीये” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “नेहमीच-अगदी नेहमीच-ते Thar चालक असतात. असं का? ती गाडी आता वेडेपणाचं प्रतीकच बनली आहे की काय?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Ambala road accident viral video thar scorpio collision night drive turns tragic viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • Video Viral
  • viral accident video
  • viral news

संबंधित बातम्या

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! गाडी चालवताना कॅब ड्रायव्हर पाहत होता ‘तारक मेहता…’;  जाब विचारताच प्रवाशाला दाखवला बाहेरचा रस्ता
1

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! गाडी चालवताना कॅब ड्रायव्हर पाहत होता ‘तारक मेहता…’; जाब विचारताच प्रवाशाला दाखवला बाहेरचा रस्ता

कहा से आते है ऐसे लोग! शोकसभेदरम्यान मृत आईच्या फोटोसमोर अश्लील गाण्यांवर डान्स; VIDEO पाहून नेटकरी संतापले
2

कहा से आते है ऐसे लोग! शोकसभेदरम्यान मृत आईच्या फोटोसमोर अश्लील गाण्यांवर डान्स; VIDEO पाहून नेटकरी संतापले

एक चूक अन् अनर्थ घडला! धावत्या ट्रेनमध्ये चढताना तोल गेला आणि रुळाखाली चिरडली गेली आई-लेकाची जोडी; घटनेचा चित्तथरारक Video Viral
3

एक चूक अन् अनर्थ घडला! धावत्या ट्रेनमध्ये चढताना तोल गेला आणि रुळाखाली चिरडली गेली आई-लेकाची जोडी; घटनेचा चित्तथरारक Video Viral

झाडावरून झाला पैशांचा पाऊस! वकिलाची बॅग चोरत माकडाने हवेत उधळले 2 लाख रुपये, लोकांची झुंबड अन् दृष्यांनी वेधले लक्ष; Video Viral
4

झाडावरून झाला पैशांचा पाऊस! वकिलाची बॅग चोरत माकडाने हवेत उधळले 2 लाख रुपये, लोकांची झुंबड अन् दृष्यांनी वेधले लक्ष; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.