(फोटो सौजन्य: X)
काय आहे प्रकरण?
माहितीनुसार, ही घटना ही घटना उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्हा न्यायालय परिसरात घडल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी एक वकील प्रॉपर्टीचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणि स्टँम्प पेपर खरेदी करण्यासाठी आपल्यासोबत एक पैशांची बॅग घेऊन आला होता. सांगितलं जात आहे की, या बॅगेत तब्ब्ल २ लाख रुपयांची कॅश होती. वकील जेव्हा चेंबरच्या बाहेर उभा होता तेव्हा अचानक एक माकड त्याच्या जवळ आला आणि त्याने वकीलाच्या हातून ही पैशांची बॅग हिसकावून घेतली. वकील त्याला पकडेल याआधीच तो तिथून बॅग घेऊन फरार झाला आणि एका झाडावर चढून त्याने हवेतून नोटांचा वर्षाव केला.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात झाडावरुन नोटांचा वर्षाव होताना दिसतो. यात काही लोक संधीचा फायदा घेत नोटा वेचून त्या आपल्या खिशात टाकतानाही दिसून येतात. मिळालेल्या माहितीनुसार, वकिलाने कोर्टातील काही परिचित लोकांना बोलावून हे सर्व पैसे वेचले ज्यात त्याला यश तर आले पण संपूर्ण नगद त्याच्या हाती आली नाही. वकीलाने एकूण 1.95 लाख रुपये लोकांच्या मदतीने जमा केले पण बाकी 5,000 रुपये मात्र त्याच्या हाती लागले नाही. सोशल मिडियावर ही घटना सध्या चांगलीच ट्रेंड करत असून घटनेचा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मिडिया प्लॅटफाॅर्म्सवर शेअर करण्यात आला आहे.
हा व्हिडिओ @Vishnu1340367 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. बुलंदशहरमध्ये एका माकडाने २ लाख रुपये असलेली एक पिशवी हिसकावून घेतली आणि झाडावरून नोटा विखुरल्या; मात्र, त्यातील बहुतांश रक्कम नंतर परत मिळवण्यात आली’.
Monkey snatches ₹2 lakh bag from man at Bulandshahr district court, climbs neem tree, tears it open & rains cash. Bystanders scramble & recover most of it. UP chaos! 😂
pic.twitter.com/uHoAE348T5 — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 1, 2026
व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या घटनेवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “हाच प्रकार खूप वर्षांपूर्वी दिल्लीतही घडला नव्हता का? ‘मामला लीगल है’ या सिरिजमध्येही हेच पाहिलं होतं….”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हा तर प्राणीसृष्टीचा प्रत्यक्ष ‘रॉबिन हूड’च आहे. कोणताही कर नाही, फक्त निखळ वाटप!लं” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “माकडने कदाचिक पैसा फेक तमाशा देख हे गाणं ऐकलं असावं”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






