(फोटो सौजन्य: X)
मेलेल्या जीवासोबत थरारक स्टंट! व्यक्तीने मेलेल्या सापाला टाकलं तोंडात अन् मग जे घडलं… Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओत केलेल्या दाव्यानुसार, हा व्हिडिओ बांग्लादेशातून समोर येत आहे. व्हिडिओत रस्त्याच्या बाजूला काही लोक तरुण श्वानाला त्रास देताना दिसून येतात. कुत्रा प्रचंड घाबरलेला असतो आणि त्यांच्यापासून दूर जाण्यासाठी तो अगदी कोपऱ्याला तोंड लपवून बसलेला असतो. अशातच जमलेल्या तरुणांमधील एकजण श्वानाला उचलतो आणि पुलावरुन थेट खाली फेकून देतो. पुलाच्या खाली एक खोल नदी असते ज्यात श्वानाला निर्दयीपणे फेकून दिले जाते. मुख्य म्हणजे यावेळी त्याच्या गळ्याला एक वीट देखील बांधलेली असते. गळ्याला वीट बांधूनच त्याला खोल नदीत फेकले जाते. नदीत फेकल्यानंतर श्वान पाण्यात बचावासाठी संघर्ष करताना दिसतो पण काहीच सेकंदात त्याची ही धडपड कमी होते. व्हिडिओतील दृष्यांवर आता यूजर्स भडकले असून नेटकऱ्यांनी तरुणांवर कारवाईची मागणी केली आहे.
स्थानिकांमध्ये असंतोष
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला. माहितीनुसार, स्थानिकांनी आरोपींना पकडून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनास्थळी उपस्थित लोकांनी आरोपींना माफीही मागायला लावली. पोलिसांनी आरोपींना ताब्याच घेतलं असून त्यांच्यावर लवकरच कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. मुख्य आरोपीसोबतच अन्य व्यक्तींची ओळख पटवून घेतली जात आहे जेणेकरुन त्यांच्यावरही योग्य ती कारवाई केली जाईल.
A innocent street dog brutually K!lled by Bangladeshi 🇧🇩young men.😡https://t.co/HPquWFSACn — Musaltaa (☀️ ➡️ 🤲 × 5️⃣ = 🛐) (@Musaltaa) June 25, 2026
घटनेचा व्हिडिओ @Musaltaa नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘बांगलादेशी तरुणांनी एका निष्पाप रस्त्यावरील कुत्र्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “गोड कुत्र्याला भावपूर्ण श्रद्धांजली, त्या दुष्ट राक्षसांनी तुझ्यासोबत जे काही केले, त्याबद्दल मला खूप वाईट वाटत आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बांगलादेशी पोलिसांनी त्याला अटक केल्याचे वाचले” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “एक दिवस तुम्हालाही असाच मृत्यू येईल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






