Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘डीएम अंकल, रोड बनवून द्या…’, शाळकरी मुलीची जिल्हाधिकाऱ्यांना आर्त हाक, रस्त्यावरील खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे होतोय त्रास

Little Girl Video : रस्ते दुरुस्तीसाठी चिमुकलीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली खास विनवणी. व्हिडिओतील तिचे धाडस आणि न डगमगता बोलण्याच्या शैलीने यूजर्सने केलं खुश. मुलगी व्हिडिओत नेमकं काय म्हणाली ते एकदा पाहाच.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 30, 2026 | 12:00 PM
'डीएम अंकल, रोड बनवून द्या...', शाळकरी मुलीची जिल्हाधिकाऱ्यांना आर्त हाक, रस्त्यावरील खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे होतोय त्रास

'डीएम अंकल, रोड बनवून द्या...', शाळकरी मुलीची जिल्हाधिकाऱ्यांना आर्त हाक, रस्त्यावरील खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे होतोय त्रास

Follow Us
Follow Us:
  • चिमुकलीने डीएमकाकांकडे केली रस्ता दुरुस्तीची मागणी
  • खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे अपघाताचा धोका
  • मुलीच्या धाडसाचं नेटकऱ्यांकडून कौतुक
उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यातून एका चिमुकलीचा व्हिडिओ सोशल मिडियावर फार वेगाने व्हायरल होत आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील क्रिस्टल गार्डनजवळ राहणाऱ्या या शाळकरी मुलीने व्हिडिओत आपली खंत मांडली आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे एक विशेष मागणी केली. मुलगी म्हणते की, ” डीएम काका, आमच्या घराजवळचा रस्ता बनवून द्या. यात खूप मोठे खड्डे झालेत ज्यात पाणी साचत आणि आम्ही यात बुडून जातो”. लहान वयात मुलीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली ही मागणी पाहून अनेकांना आनंद झाला. मुलगी लहान असली तरी धाडसाने तिने आपली समस्या व्हिडिओत मांडली ज्यासाठी इंटरनेटवर आता मुलीची चांगलीच प्रशंसा केली जात आहे तर मुलीच्या समस्येचे निवारण करण्याचीही मागणी केली जात आहे.

‘जिगरबाज ड्रायव्हर!’ निवासी भागात ट्रकला लागली भीषण आग; स्वतःचा जीव धोक्यात घालून रोखला अनर्थ; Video Viral

चिमुकलीच्या या व्हिडिओने अनेक खेड्यापेड्यातील सत्य परिस्थिती दाखवून दिली. अनेक गावांमध्ये किंवा लहान शहरांमध्ये रस्त्यातील खड्ड्यांमुळे रस्ते अक्षरश: खळग्यांप्रमाणे दिसून येतात. या खड्ड्यांमधून गाडी चालवणे म्हणजे चालकाचा आणि रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. मागेच एका व्हायरल व्हिडिओत रस्त्यातील खड्ड्यात बाईक अडकल्याने चालकाचा गंभीर अपघात झाल्याचे दृष्य व्हायरल झाले होते. अशात चिमुकलीची रस्ते दुरुस्तीची काही चुकीची नाही.

व्हिडिओ मुलगी ज्या ठिकाणी उभी आहे त्याच्या मागे रस्त्याचे झालेले बेहाल स्पष्टपणे दिसते. यात रस्त्यावर चिखल आणि मोठमोठे खड्डे दिसून येतात ज्यात पाणी साचलेलं असतं. मुलगी व्हिडिओत सांगते की, खड्ड्यातील या पाण्यामुळे अपघाताची स्थिती निर्माण होते. पिडितांच्या मदतीसाठी प्रशासनाने तातडीने यावर कारवाई करावी अशी मागणी ती व्हिडिओत करते. लहान वयात मुलीचे धाडस आणि न डगमगता समस्या मांडण्याची तिची शैली पाहून अनेक यूजर्स मुलीवर खुश झाले आहेत. चिमुकलीची समस्या लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ यावर कारवाई करावी अशी मागणीही आता नेटकरी करत आहेत.

DM अंकल मेरे घर की रोड बनवा दीजिए, बहुत बड़े-बड़े गड्ढे है। हम डूब गए थे पानी भर जाता है। सड़क बनवाने के लिए बाराबंकी के जिलाधिकारी से नन्ही सी बच्ची ने लगाई गुहार।@DM_Barabanki pic.twitter.com/4NbLarOKdf — Ajju_रायसना (@IamAjju9984) August 26, 2026

अगं बाईई… आता रोबोट्सनेही सुरू केली चीटिंग? शर्यत जिंकण्यासाठी लावला अजब डोकेबाजीतला जुगाड; Video Viral

दरम्यान पावसाळ्यात रस्ते खराब होणे, त्यावर खड्डे पडणे, पाणी साचणे या समस्या फार सामान्य आहेत. पण याकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी रस्त्याचे काम पूर्ण करणे किंवा रस्ते दुरुस्ती फार गरजेचे आहे. पावसाच्या दिवसात रस्ते निसरडे असल्याने रस्त्यात जर एखादा खड्डा गाडीच्या आड आला तर मोठा अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळेत योग्य ती उपाययोजना करून रस्त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक ठरते.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Barabanki little girl appeals dm for road repair viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • Bad Roads
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

मेरठमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! रस्त्यावर खेळणाऱ्या २ चिमुकल्यांच्या अंगावरून गेली भरधाव कार, Video Viral
1

मेरठमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! रस्त्यावर खेळणाऱ्या २ चिमुकल्यांच्या अंगावरून गेली भरधाव कार, Video Viral

CJP Protest Video: मोठा लाॅस झाला! पोलिस व्हॅनच्या खिडकीतून बाहेर निघू लागली तरुणी, स्वत: राहिली आत अन् फोनच गेला चोरीला…
2

CJP Protest Video: मोठा लाॅस झाला! पोलिस व्हॅनच्या खिडकीतून बाहेर निघू लागली तरुणी, स्वत: राहिली आत अन् फोनच गेला चोरीला…

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’
3

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’

पाठीवर लेकरू आणि हातात कष्टांची जबाबदारी, मातेच्या अफाट जिद्दीने पाझरवले नेटकऱ्यांचे डोळे; Video Viral
4

पाठीवर लेकरू आणि हातात कष्टांची जबाबदारी, मातेच्या अफाट जिद्दीने पाझरवले नेटकऱ्यांचे डोळे; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.