
BCCI India Map Controversy
मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास २५ मिनिटे चाललेल्या लाईट शोमध्ये आयपीएल ट्रॉफीवर लेझर लाईट्सच्या मदतीने भारताचा नकाशा दाखवण्यात आला होता. मात्र, या नकाशातून जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, बिहार आणि ईशान्य भारताचा भाग गायब होता. हा चुकीचा नकाशा लाईव्ह प्रक्षेपित झाल्याने मोठा वाद पेटला आहे.
Hello @IPL & @BCCI What kind of Indian map is this? The premier cricket sporting event in the world is being broadcast from India, and we can’t even show our map correctly?#IPL #India #Cricket pic.twitter.com/6tIBhsUl35 — Yash Chokshi (@ChokshiYash) May 26, 2026
सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी BCCI ला आणि BCCI चे माजी सचिव व सध्याचे ICC प्रमुख जय शाह यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. भारताच्या नकाशाबाबात एवढी मोठी चूक कशी होऊ शकते असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करत RCB ने २० षंटकात २५३ धावांचा डोंगर GT समोर उभा केला होता. या धावांचा पाठलाग करत GTने १६२ धाव घेतल्या. यामध्ये RCB ने ९३ धावांवर विजय मिळवत फायनलमध्ये एन्ट्री मारली. मात्र, सामन्यातील विजयापेक्षा सध्या सोशल मीडियावर BCCI ने दाखवलेल्या चुकीच्या नकाशाचीच चर्चा सुरु आहे.
What the hell is wrong with @IPL? A distorted map of India is being shown LIVE during the broadcast. This is not a small “graphics mistake” it’s a serious issue involving India’s territorial integrity. How did this get approved by @BCCI and the production team? pic.twitter.com/QY6DhMvoTV — Nimesh Kamdar (@nimesh0916) May 26, 2026
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.