Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रद्धा की अंधश्रद्धा? इथे फेकलेल्या प्रसादाला छत्रीत पकडून केले जाते सेवन; हजारो भाविकांची गर्दी अन् गणपती पूजेचा Video Viral

फेकलेल्या प्रसादाला ग्रहण करण्याची परंपरा! बीडमधील मंदिराची एक अनोखी परंपरा सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. इथे मंदिराचा प्रसाद भाविकांच्या हातात दिला जात नाही तर तो छतावरून खाली फेकला जातो.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 04, 2025 | 12:19 PM
श्रद्धा की अंधश्रद्धा? इथे फेकलेल्या प्रसादाला छत्रीत पकडून केले जाते सेवन; हजारो भाविकांची गर्दी अन् गणपती पूजेचा Video Viral

श्रद्धा की अंधश्रद्धा? इथे फेकलेल्या प्रसादाला छत्रीत पकडून केले जाते सेवन; हजारो भाविकांची गर्दी अन् गणपती पूजेचा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

गणेशोत्सवाचा सणानिमित्त सोशल मीडियावर आता गणपतीचे, त्याच्या देखाव्याचे आणि गणेश मंदिरांचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहेत. अशातच बीडमधील एका मंदिराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मंदिरातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा लोकांना आश्चर्य करत आहे. येथे असलेल्या गणपती मंदिराची एक अनोखी परंपरा गेल्या १०० वर्षांपासून चालत आली आहे. या मंदिरात प्रसाद वाटण्याची पद्धत इतर ठिकाणांपेक्षा फार वेगळे आहे. येथे पूजा केल्यानंतर प्रसाद भाविकांच्या हातात दिला जात नाही, तर मंदिराच्या छतावरून खाली फेकला जातो.

ओसाड जागा अन् आतमध्ये दडलीयेत जणू हजारो बोटं, मानवी डोळ्याला 1000x झूम केल्यावर दिसून आलं हादरवणारं दृश्य; Video Viral

काय आहे ही परंपरा

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, मंदिराच्या छतावरून प्रसादाला फेकले जात आहे आणि खाली भाविकांची गर्दी छत्री उलटी पकडून याला प्रसादाला आपल्या छत्रीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. हे दृश्य पाहण्यासाठी लोक दूरवरून येतात. गौरी पूजनाच्या वेळी ही परंपरा विशेषतः दिसून येते. या निमित्ताने मोठ्या प्रमाणात प्रसाद तयार केला जातो आणि नंतर छतावरून तो भाविकांमध्ये वाटला जातो. स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की ही परंपरा केवळ भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक नाही तर परस्पर बंधुता आणि आनंदाचा संदेश देते. जेव्हा प्रसाद छतावरून खाली येतो तेव्हा सर्वांना तो समान प्रमाणात मिळतो. कोणाकडे मोठे भांडे असो किंवा छत्री, प्रसाद मिळाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतो.

ही परंपरा १०० वर्षांपूर्वी सुरू झाली होती

गावातील वडीलधारी लोकांचा असा विश्वास आहे की, ही परंपरा मागील १०० वर्षांपासून सुरु आहे आणि आजतागात तिला कोणी मोडू शकलं नाही. पूर्वी मंदिरात प्रसाद मोठ्या प्रमाणात तयार केला जात असे आणि तो लवकर वाटणे कठीण होते. तेव्हापासून छतावरून प्रसाद टाकण्याची परंपरा सुरू झाली, जी हळूहळू लोकांमध्ये लोकप्रिय झाली आणि आता ती धार्मिक उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे.

#Watch | बीड जिले के भगवान गणपति मंदिर की अनोखी परंपरा, जहां पूजा के बाद प्रसाद को मंदिर की छत से फेंका जाता है और श्रद्धालु उसे उल्टा छाता पकड़कर लपकते हैं। Unique tradition at Bhagwan Ganpati Temple in Beed district where after worship, the prasadam is thrown from the temple… pic.twitter.com/ZB5zBkIOPo — Asian News Bharat (@Asian_newsBH) September 3, 2025

अगरबत्तीच्या आईला काय म्हणतात? तरुणीच्या प्रश्नाने सोशल मीडियावर माजवला गोंधळ; Viral Video तून जाणून घ्या मजेशीर उत्तर

आजच्या काळातही जेव्हा आधुनिक पद्धतींचा अवलंब केला जात आहे, तेव्हा बीडचे हे मंदिर त्याच्या अनोख्या परंपरेसाठी ओळखले जाते. येथे येणाऱ्या भाविकांना केवळ गणपतीचे दर्शनच मिळत नाही, तर प्रसाद वाटपाची ही खास परंपरा देखील पाहता आणि अनुभवता येते. ही परंपरा मंदिराची ओळख बनली आहे आणि येणाऱ्या पिढ्याही ती जपण्याचे वचन देतात.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Beed ganpati temple weird ritual prasad is thrown from roof of temple and consumed devotees by catching it in an umbrella video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 12:19 PM

Topics:  

  • Beed
  • Ganesh Chaturthi 2025
  • shocking viral news
  • temple
  • viral video

संबंधित बातम्या

हँडल सोडला, पायवर केलं अन्…; भरधाव रस्त्यावर पठ्ठ्याची चालत्या स्कूटीवर धोकादायक स्टंटबाजी, Video Viral
1

हँडल सोडला, पायवर केलं अन्…; भरधाव रस्त्यावर पठ्ठ्याची चालत्या स्कूटीवर धोकादायक स्टंटबाजी, Video Viral

Airport बाहेर आला हात जोडले अन् थेट…; Alia Bhatt च्या ट्रोलर्सना उत्तर देताना Ranbir चा व्हिडिओ Viral
2

Airport बाहेर आला हात जोडले अन् थेट…; Alia Bhatt च्या ट्रोलर्सना उत्तर देताना Ranbir चा व्हिडिओ Viral

मुर्खपणाचा कळस! धावत्या ट्रेनसमोर रुळावरच उभा राहिला तरुण; पुढं जे घडलं पाहून अंगावर काटा येईल, Video Viral
3

मुर्खपणाचा कळस! धावत्या ट्रेनसमोर रुळावरच उभा राहिला तरुण; पुढं जे घडलं पाहून अंगावर काटा येईल, Video Viral

संतापजनक! मेट्रोत तरुणीला नको ते इशारे करत होता नराधाम; ताईनं असा धडा शिकवला की…; Video Viral
4

संतापजनक! मेट्रोत तरुणीला नको ते इशारे करत होता नराधाम; ताईनं असा धडा शिकवला की…; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.