(फोटो सौजन्य: Instagram)
आपले डोळे हे आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा अवयव आहे. याच्या मदतीने आपण संपूर्ण जग पाहू शकतो. हा शरीराचा एक अविभाज्य आणि नाजूक अवयव आहे. डोळ्यातील पांढरा भाग ज्याला ज्याला श्वेतपटल असे म्हणतात आणि काळी बुबुळे इतकेच काय ते आपल्याला डोळ्यांविषयी आपल्याला ठाऊक आहे पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या डोळ्यांच्या खोल आत याची एक अनोखी रचना दडलेली आहे ज्याची आपल्याला कल्पनाही नाही. नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात मानवी डोळ्याला 1000 पट खोल आत झूम करून पाहिल्यांनंतर एक धक्कादायक दृश्य दिसून आलं ज्याचा कुणी स्वप्नातही विचार केला नसेल. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये जर पाहिलं तर यात दिसतं की, कॅमेराने मानवी डोळ्यावर फोकस केला जात आहे. कॅमेरा पुढच्याच क्षणी डोळ्याने १००० पट खोल झूम करत जातो आणि यातून एक अनोखे दृश्य समोर येते. झूम केल्यानंतर, डोळ्यांच्या आत ओसाड जागा असल्याचे आणि दिसते आणि इथेच डोळ्यातील रचना ही गडू मानवी बोटांसारखी असल्याचे समजते, जे पाहून प्रत्येकजण थक्क होतात. दृश्य पाहून असे वाटते की शेकडो बोटं आपल्या डोळ्यांमध्ये दडून बसली आहेत. या व्हिडिओतूनच आपल्याला समजते की, आपले शरीर किती गुंतागुंतीचे आणि आश्चर्यकारक आहे हे दिसून येते.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर @technology नावाच्या पेजवर शेअर केला आहे, ज्याला आतापर्यंत १ लाख ३१ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे आणि ही संख्या सतत वाढत आहे. अनेक युजर्सने व्हिडिओला वेगाने शेअर केले असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. . एका युजरने लिहिले आहे, “माझ्या डोळ्यातील बोटांनाही संधिवात आहे का?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते बोटांसारखे किंवा पायाच्या बोटांसारखे दिसत आहे ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “माझ्या डोळ्यांना बोटं आहेत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.