(फोटो सौजन्य: Instagram)
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ समोर येत असतात. काही व्हिडीओ माहितीपूर्ण असतात तर काही अगदी मनोरंजनासाठी बनवलेले असतात. प्रेक्षकांना हसवणारे, गोंधळवणारे किंवा विचार करायला लावणारे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या अशाच प्रकारचा एक मजेशीर व्हिडीओ लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. व्हिडिओमध्ये तरुणी लोकांना मजेशीर आणि कोड्यात पडणारे प्रश्न विचारताना दिसून येत आहे ज्यांची उत्तरे इतकी मिश्किल आहेत की ऐकून सर्वांनाच हसू अनावर होतं. चला व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.
या व्हिडीओमध्ये एक तरुणी आपल्या मित्र-मैत्रिणींना काही मजेशीर आणि ट्रिकी प्रश्न विचारताना दिसते. तिच्या प्रश्नांना थेट उत्तर देणं एवढं सोपं नाही. ऐकायला अगदी साधे वाटणारे हे प्रश्न खरं तर कोडी आणि जोक्सच्या धर्तीवर आहेत. त्यामुळे अनेकजण हसत-हसत गोंधळून जात आहेत.
तरुणीने पहिला प्रश्न विचारला – “सात आणि नऊमध्ये काय फरक असतो?”
यानंतर दुसरा प्रश्न – “अगरबत्तीची आई कोण आहे?”
तिसरा प्रश्न अजूनच मजेदार – “फळं आपल्या वडिलांना पाहून काय म्हणतील?”
आणि शेवटचा प्रश्न – “डोळ्यांच्या भावाला काय म्हणायचं?”
हे प्रश्न ऐकल्यावर बहुतेक लोक लगेचच उत्तरं देण्याचा प्रयत्न करतात, पण नेहमीप्रमाणेच योग्य उत्तर सापडत नाही. म्हणूनच हा व्हिडीओ अधिक मनोरंजक झाला आहे. खरं तर अशा प्रकारचे जोक्स नवीन नाहीत. शालेय जीवनात मित्रांमध्ये अशी गंमत-जंमत चालायची. साध्या शब्दांना वळण देऊन केलेली ही कोडी ऐकून सगळे खळखळून हसायचे. त्यामुळे आज जेव्हा हा व्हिडीओ लोकांसमोर आला, तेव्हा अनेकांना बालपणातील आठवणी ताज्या झाल्या. अशा ट्रिकी प्रश्नांचा उद्देश लोकांना हसवणं आणि थोडा हलकाफुलका आनंद देणं हा असतो. तणावग्रस्त जीवनात काही क्षण हसून घेण्याचा हा उत्तम मार्ग आहे.
तरुणीचा हा व्हिडिओ @sanya.maini नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत ८ करोडोंहून अधिकच्या व्युज मिळाल्या आहेत तर हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे खरंच मजेशीर होत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे यार एवढं टॅलंट कुठून घेऊन येते ही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला ही रील आवडली”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.