Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अगं बाईई… आता रोबोट्सनेही सुरू केली चीटिंग? शर्यत जिंकण्यासाठी लावला अजब डोकेबाजीतला जुगाड; Video Viral

Robots Race : चीनमध्ये रोबोट्ससाठी आयोजित करण्यात आलेल्या अनोख्या रेसमध्ये एक मजेशीर प्रकार पाहायला मिळाला. स्पर्धा जिंकण्यासाठी एका रोबोटने खोटेपणा करु पाहिला ज्याला पाहून उपस्थितांसह यूजर्ससही थक्क झाले.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 29, 2026 | 03:24 PM
अगं बाईई... आता रोबोट्सनेही सुरू केली चीटिंग? शर्यत जिंकण्यासाठी लावला अजब डोकेबाजीतला जुगाड; Video Viral

अगं बाईई... आता रोबोट्सनेही सुरू केली चीटिंग? शर्यत जिंकण्यासाठी लावला अजब डोकेबाजीतला जुगाड; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • बीजिंगमध्ये रोबोट्सची अनोखी रेस
  • जिंकण्यासाठी रोबोटने केली चीटिंग
  • VIDEO व्हायरल; नेटकरीही झाले हैराण
चीनची राजधानी बीजिंगमध्ये अलिकडे एक आगळीवेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. धावण्याची ही स्पर्धा माणसांमध्ये नाही तर चक्क रोबोट्ससाठी अरेंज करण्यात आली होती. म्हणजेच या स्पर्धेतील सर्व खेळाडू हे ह्युमनॉइड रोबोट होते. याला वर्ल्ड ह्यूमेनॉइड रोबोट गेम्स (World Humanoid Robot Games) असे नाव देण्यात आले होते. यादरम्यान रोबोट्सने अनेक खेळांमध्ये भाग घेतला पण यातील धावण्याच्या शर्यतीत मात्र अनोखा प्रकार घडून आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. चला यात नक्की काय घडून आलं ते सविस्तर जाणून घेऊया.

तुरुंगाच्या भिंतीही अडवू शकल्या नाहीत बहिणीचं प्रेम! सोनीपत जेलमध्ये भावाच्या मनगटावर सजली राखी; भावूक Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये आपल्याला धावण्याच्या शर्यतीतील काही दृष्ये दिसून येतात. एकूण चार ह्यूमेनॉइड रोबोट्सने यात भाग घेतलेला असतो. सर्व रोबोट्स धावण्यासाठी तयार होतात आणि गेट सेट गो म्हणताच आत्मविश्वासाने पळू लागतात. जिकंण्यासाठी सर्वांचीच तयारी जबरदस्त असते पण एक रोबोट मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतो. याचे कारण म्हणजे रोबोटने जिंकण्यासाठी केलेली चिटिंग. खरंतर आपण जिंकून यावं यासाठी स्पर्धेत एक रोबोट खोटेपणा करताना पकडला जातो. तो एक एक करुन इतर रोबोट्सना खाली पाडतो आणि चिटिंग करत स्पर्धा जिंकतो. माणसं खोटेपणा करतात हे तर आपल्याला आजवर माहिती होतंच पण रोबोट्सही खोटेपणा करु शकतात ही गोष्ट व्हिडिओत पहिल्यांदाच पाहायला मिळाली. रोबोटच्या या चिटिंगने अनेकांना थक्क केलं असल्याने व्हिडिओ पाहताच यूजर्सने त्याला वेगाने शेअर करण्यास सुरुवात केली.

VIDEO : ‘आधी भारतीय, मग मराठी’; प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी रिक्षाचालकाची धडपड, हिंदीच्या ओळी लिहून शिकतोय मराठी

हा व्हिडिओ @deshsutra नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेक यूजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत यातील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. एका यूजरने म्हटले की, “कुणीतरी म्हटलं की, हा रेड चिपमधील चिट्टी द रोबोट आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्या रोबोटला अपात्र ठरवले पाहिजे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “माणसं तर माणसं आता रोबोट्सही खोटेपणा करु लागले राव”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Beijing humanoid robot race cheating viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • China
  • Robot
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

CA अवंतिका भट्टने कुत्र्याच्या भांड्यातून प्यायले पाणी; यूट्यूबर साैरव जोशीची पत्नी चर्चेत; Video Viral
1

CA अवंतिका भट्टने कुत्र्याच्या भांड्यातून प्यायले पाणी; यूट्यूबर साैरव जोशीची पत्नी चर्चेत; Video Viral

पतीशी भांडण अन् पत्नीने मारली विहिरीत उडी! बराच वेळ रंगला हायव्होल्टेज ड्रामा; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
2

पतीशी भांडण अन् पत्नीने मारली विहिरीत उडी! बराच वेळ रंगला हायव्होल्टेज ड्रामा; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

China Pakistan: ‘पाकिस्तानी मुलींपासून दूर राहा’, चीन सरकारने आपल्या नागरिकांना का दिला इशारा? ‘हे’ आहे मुख्य कारण
3

China Pakistan: ‘पाकिस्तानी मुलींपासून दूर राहा’, चीन सरकारने आपल्या नागरिकांना का दिला इशारा? ‘हे’ आहे मुख्य कारण

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral
4

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.