फोटो सौजन्य सोशल मिडिया
Bhubaneswar Viral Video : ओडिशा मधील भुवनेश्वरमधून एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करणे आणि कायदा व सुव्यवस्था राखणे हे काम करणाऱ्या वाहतूक पोलीस चौकीत एक तरुण अमली पदार्थांचे सेवन करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. भुवनेश्वर येथील श्रेया चौकातील वाहतूक पोलीस सहाय्यक चौकीच्या आतला हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, चौकीच्या बाहेर वाहतूक पोलीस तैनात असून सुद्धा हा तरुण चौकीच्या आत अमली पदार्थांचे सेवन करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये हा तरुण रात्रीच्या वेळी अमली पदार्थांचे सेवन करताना दिसला. अमली पदार्थांचे सेवन केल्यानंतर हा तरुण चौकीच्या आत झोपताना सुद्धा दिसला.
ट्रैफिक पुलिस चौकी के अंदर ही नशा करने लगा युवक, वायरल वीडियो देखकर हर कोई हैरान https://t.co/IHWoZIRjh8 — Subhash Kumar (@ImSubhashojha) November 3, 2026
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, पोलिसांच्या उपस्थितीत अशा गोष्टी कशा घडतात. यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. असे माहिती आहे की, चौकीच्या आत काही तरुणांच्या हालचाली मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाल्या होत्या. कॅमेरा दिसताच त्या तरुणाने पळ काढला. पोलीस रस्त्यांवर वाहनांची तपासणी करून वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी करत असताना, त्यांच पोलीस चौकीत अमली पदार्थांचे सेवन करतानाचा हा प्रकार उघडकीस आला.
Elephant Attack Viral Video : हत्तीला हुसकावण्याचा प्रयत्न, दगडफेक करताच केला गावकऱ्यांचा पाठलाग
सध्याचा सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, पोलीस चौकीचा वापर अमली पदार्थांच्या सेवनासाठी कसा केला जात होता. श्रेया चौक वाहतूक पोलीस मदत चौकीशी संबंधित या घटनेमुळे राजधानी भुवनेश्वरमधील पोलीस देखरेख आणि सार्वजनिक सुरक्षेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
Ans: भुवनेश्वर येथील श्रेया चौकातील वाहतूक पोलीस मदत चौकीत घडल्याचे सांगितले जात आहे.
Ans: व्हिडिओमध्ये एक तरुण पोलीस चौकीच्या आत अमली पदार्थांचे सेवन करताना आणि त्यानंतर झोपताना दिसत आहे.
Ans: मिळालेल्या माहितीनुसार, चौकीच्या बाहेर वाहतूक पोलीस तैनात होते.






