फोटो सौजन्य सोशल मिडिया
यामुळे गावातील लोकांनी जीव वाचवण्यासाठी हत्ती पासून पळ काढला.याच हत्तीने या परिसरात एका व्यक्तीच्या मोटारसायकलचेही नुकसान केले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेचा संपुर्ण व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
एक जंगली हत्ती गावातील नागरिकाचा पाठलाग करताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियाच्या माध्यामातून समोर येत आहे. या व्हिडिओ मध्ये एका हत्तीला शेतातून हाकलून देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ही घटना आसाम येथील मोरांगी परिसरातील ढलागुरी आणि मिरीपाथर गावांच्या जवळ घडली. या भागात मानवी वस्ती असल्याने येथे हत्तींचा वावर जास्त प्रमाणात आहे.
Elephant chased a man and then went on to smash a motorcycle https://t.co/sfnm5n5u84 — Surajit (@surajit_ghosh2) November 3, 2026
मिळालेल्या माहिती नुसार या घटनेत स्थानिकांनी हत्तीला तिथून दूर करण्यासाठी दगडफेक केली, तेव्हा तो त्यांच्या दिशेने धावून आला. यामुळे घाबरलेले गावकरी जीव वाचवण्यासाठी पळून गेले. या घटनेत कोणीही गंभीर जखमी झाले नाही. अशी माहिती वर्तवण्यात येत आहे.
हत्ती मानवी वस्तीत शिरल्यास किती मोठा धोका निर्माण होऊ शकतो, हे या घटनेवरून स्पष्ट होते. याच परिसरातील गावांतून मिळालेल्या माहितीनुसार, एका संतप्त हत्तीने एका व्यक्तीचा पाठलाग करताना त्याच्या मोटारसायकलचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या घटनेत सुदैवाने कोणीतीही जिवित हानी झालेली नाही.






