Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोव्याच्या फ्लाईटमध्ये प्रियकराचा गेम ओव्हर! एकाच प्रवासात समोर आल्या तीन गर्लफ्रेंड्स, विमानातच सुरु झाला गोंधळ; Video Viral

Fight Video Viral : इन-मीन-तीन! जणू विमानानेच रचला कट, फ्लाईटमध्ये एकाच वेळी तीन गर्लफ्रेंड्स भेटल्या अन् रंगेहात पकडला गेला प्रियकर. व्हिडिओत पुढे काय घडलं ते पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: May 27, 2026 | 03:30 PM
गोव्याच्या फ्लाईटमध्ये प्रियकराचा गेम ओव्हर! एकाच प्रवासात समोर आल्या तीन गर्लफ्रेंड्स, विमानातच सुरु झाला गोंधळ; Video Viral

गोव्याच्या फ्लाईटमध्ये प्रियकराचा गेम ओव्हर! एकाच प्रवासात समोर आल्या तीन गर्लफ्रेंड्स, विमानातच सुरु झाला गोंधळ; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • गोव्याच्या प्रवासादरम्यान तरुणाचं गुपित उघडलं.
  • गोव्याच्या फ्लाईटमध्ये घडला प्रकार.
  • घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
असं म्हणतात की खोटं हे फार काळ लपवलं जाऊ शकत नाही. आपलं खोटं हे कधी ना कधी समोर येतंच पण किती वाईटरित्या आपलं हे खोटं पकडलं जाऊ शकतं ते तुम्हाला आताच्या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक प्रियकर आपल्या गर्लफ्रेंडसोबत गोवा ट्रिपसाठी जात होता आणि याचवेळी फ्लाईटमध्ये त्याची इतर दोन गर्लफ्रेंड्ससोबत भेट होते. तरुण एकाचवेळी तीन मुलींना गुपचूप डेट करत होता पण फ्लाईटमध्ये तीघींसमोर त्याची ही चोरी सार्वजनिकरित्या पकडली जाते ज्यानंतर विमानात एकच गोंधळ सुरु होतो. एकाच वेळी तीघींची समजूत काढताना तरुणाची तारंबळ उडल्याचे दिसते तर प्रवासी मात्र घटनेची चांगलीच मजा लुटताना दिसतात.

जेवणाचं बिल कोण देणार? लहान गोष्टीवरुन मित्रांमध्ये सुरु झाली WWE फाईट, लाथाबुक्क्यांनी हाणत जमिनीवर पटकलं; Video Viral

सोशल मिडियावर या घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये विमानात गोंधळ सुरु असल्याचे दिसते. तरुण आणि तीनही प्रेयसींमध्ये मोठा वाद पेटलेला असतो. हा वाद शारीरिक हिंसेपर्यंत पोहचत नाही पण यात शाब्दिक बाचाबाची नक्कीच रंगते. इतर प्रवासी या घटनेची सीटवर बसूनच मजा घेत असतात. एक एअर हाॅस्टेस त्यांचा हा वाद मिटवण्यासाठी आणि विमानातील गोंधळ शांत करण्यासाठी मध्यस्ती बनते पण त्याचा या वादावर फारसा फरक पडत नाही. आपली फसवणूक झाली आहे यावरुन तीनही गर्लफ्रेंड्स रागाने इतक्या पेटलेल्या असतात की त्या तरुणाला डाफरायची एकही संधी चुकवत नाहीत. आता हा सर्व हाय व्होल्टेज ड्रामा खरा आहे की स्क्रिप्टेड याची मात्र अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

🚨🚨🚨
गोवा जाने से पहले फ्लाइट में खुली पोल !
एक नहीं, तीन गर्लफ्रेंड… एयरपोर्ट पर मचा बवाल
किसी किसी पर एक भी नहीं है, और ये कई-कई को घुमा रहा है
सोनो तो.. pic.twitter.com/jQYn4Nrxch
— कर्म ही पूजा है (@gambhirsin24472) May 19, 2026

आई शेवटी आईच असते! दलदलीत अडकून पिल्लाचा मृत्यू, तासनतास त्याला बिलगून राहिली हत्तीण, मन हेलावून टाकाणारा Video Viral

हा व्हिडिओ @gambhirsin24472 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘गोव्याला निघण्यापूर्वी विमानातच गुपित उघड झालं! एक नाही, तर तीन गर्लफ्रेंड्स… विमानतळावर गोंधळ उडाला. काहींना तर एकही गर्लफ्रेंड नाही, आणि तो तर अनेकींना डेट करत आहे’. या अजब-गजब घटनेवर आता यूजर्सने मिश्किल प्रतिक्रिया करत घटनेची चांगलीच मजा लुटल्याचे दिसले. यात एका यूजरने म्हटले की, “ही एअरलाइनची चूक आहे, त्यांनी सगळ्यांची तिकिटे एकाच वेळी का बुक केली?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हा स्क्रिप्टेड व्हिडिओ दिसतोय” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “म्हणून एकापेक्षा जास्तीचा मोह ठेवू नये”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Boyfriend caught dating three girlfriends on goa flight airplane drama viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • funny video
  • Goa
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

भक्ती की अंधश्रद्धा? कचऱ्याच्या डब्यालाच मानले देव; जल अर्पण करून लावला टिळक; Video Viral
1

भक्ती की अंधश्रद्धा? कचऱ्याच्या डब्यालाच मानले देव; जल अर्पण करून लावला टिळक; Video Viral

१ रुपयांत भरपेट नाश्ता! भारतामध्ये ‘या’ ठिकाणी मिळतो सर्वात स्वस्त नाश्ता; सकाळीच भरते खवय्यांची गर्दी; Video Viral
2

१ रुपयांत भरपेट नाश्ता! भारतामध्ये ‘या’ ठिकाणी मिळतो सर्वात स्वस्त नाश्ता; सकाळीच भरते खवय्यांची गर्दी; Video Viral

‘डीएम अंकल, रोड बनवून द्या…’, शाळकरी मुलीची जिल्हाधिकाऱ्यांना आर्त हाक, रस्त्यावरील खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे होतोय त्रास
3

‘डीएम अंकल, रोड बनवून द्या…’, शाळकरी मुलीची जिल्हाधिकाऱ्यांना आर्त हाक, रस्त्यावरील खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे होतोय त्रास

‘जिगरबाज ड्रायव्हर!’ निवासी भागात ट्रकला लागली भीषण आग; स्वतःचा जीव धोक्यात घालून रोखला अनर्थ; Video Viral
4

‘जिगरबाज ड्रायव्हर!’ निवासी भागात ट्रकला लागली भीषण आग; स्वतःचा जीव धोक्यात घालून रोखला अनर्थ; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.